By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?
टॉप स्टोरीज़

शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?

News Desk
Last updated: 2025/06/10 at 1:14 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Agriculture Scheme: शेतकऱ्यांना आता शून्य रुपये खर्चात फळबाग लावता येणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केलीये. agriculture scheme: शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?

Last Updated:June 10, 2025 6:24 PM IST

Agriculture Scheme: शेतकऱ्यांना आता शून्य रुपये खर्चात फळबाग लावता येणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केलीये.

X

agriculture scheme: शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?

नाशिक: सध्याच्या काळात अनेक शेतकऱ्यांचा कल फळबागांच्या शेतीकडे वाढला आहे. परंतु, काही शेतकऱ्यांना फळबागेचा खर्च पेलवत नाही. असे शेतकरी सुद्धा आता बागायतदार होऊ शकतात. सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी एक खास योजना आणली असून यातून फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळत आहे. याच योजनेविषयी नाशिकचे कृषी उपसंचालक महेश वेटेकर यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिलीये.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच मनरेगातून नाशिक जिल्ह्यात 3500 हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या दोन योजनांच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत आंब्यांची सर्वाधिक लागवड करण्यात आल्याने कांदा अन् द्राक्षां साठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आता आंबा पीकही घेतले जाणार आहे. कृषी विभागाने येणाऱ्या हंगामात या दोन योजनांद्वारे फळबाग लागवड वाढावी यासाठी आराखडा तयार केला आहे. प्रत्येक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांना यासंदर्भात आढावा घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती वेटेकर यांनी दिली.

काय आहे फळबाग योजना ?

फळबाग योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी फळबागा लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना फळबागांसाठी लागवड खर्च, योग्य रोपे, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन यांसारखी मदत पुरवत असते.

फळबाग लागवड योजनेसाठी निकष

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लाभ कोकण विभागासाठी कमाल 10.0 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल 6.0 हेक्टर क्षेत्र मर्यादपर्यंत अनुज्ञेय आहे. अनुदान मर्यादा 100 टक्के असून राज्य शासनाची योजना आहे. वैयक्तिक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.

मनरेगा फळबाग योजना

जॉब कार्ड धारक असलेल्या अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड करता येते. तसेच, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेत, अनुदान तीन वर्षांमध्ये देय असते आणि ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.

योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा संबंधित कार्यालयात अर्ज करायचा आहे. योजनेनुसार, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये जमिनीचे दाखले, आधार कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच, योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत, शासनाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेत 100 टक्के अनुदान मिळत असल्याचे कृषी उपसंचालक महेश वेटेकर यांनी सांगितले.

Location :

Nashik,Maharashtra

First Published :

June 10, 2025 6:24 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

शुन्य रुपयात व्हा बागायतदार, फळबाग लावण्यासाठी 100 टक्के अनुदान, ही योजना माहितीये का?

TAGGED: agriculture scheme, bhausaheb fundkar orchard plantation scheme, farmer scheme, government scheme, local18, orchard cultivation, कृषी, फळबाग योजना, फळबाग लागवड योजना अर्ज, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड
Previous Article Agriculture News : वर्षानुवर्षे सुरू असलेले जमिनींचे वाद मिटणार! महसूल विभाग राबवणार हा नवीन उपक्रम, कसा फायदा होणार?
Next Article भारतीय कंपन्या पुढील years वर्षांत 850 अब्ज डॉलर्सची विक्रम नोंदवतील, इलेक्ट्रिक-एरलाइन्स-ग्रीन हायड्रोजन हायड्रोजन-इंडिया 850 अब्ज डॉलर कॅपेक्स सर्ज ग्रीन एनर्जी एअरलाइन्स लीड इन्व्हेस्टमेंट बूममध्ये दिसून येईल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

केस्टोन मुंबईच्या क्षेत्राचा पुनर्विकास करेल – केस्टोन मुंबई क्षेत्रासह पुनर्निर्मिती करेल
Business July 1, 2025
पुणे रिअल इस्टेट: पुण्यातील गोदाम आणि औद्योगिक रिअल इस्टेटची भरभराट, मुंबई-दिल्ली मागे डावीकडे; परदेशी गुंतवणूकदार देखील व्याज दर्शवित आहेत – पुणे औद्योगिक रिअल इस्टेट ग्रोथ 2030 डिमांड जेएलएल रिपोर्ट ग्रेड ए वेअरहाउसिंग
Business July 1, 2025
फ्लिपकार्ट -बॅक केलेली कंपनी शेडोफॅक्स आयपीओ आणेल: ₹ 2,500 कोटी वाढविण्यासाठी तयार आहे, सेबीने एक मसुदा दाखल केला – शेडोफॅक्स आयपीओ ड्राफ्टने 2500 क्रेअर वाढविण्यासाठी फ्लिपकार्ट बॅक्ड लॉजिस्टिक फर्म दाखल केली.
Business July 1, 2025
इंडो -यूएस व्यापार करार लवकरच अंतिम होईल, ट्रम्प लवकरच घोषित करू शकतातः व्हाइट हाऊस – इंडिया अमेरिका ट्रेड करार
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?