Last Updated:
PM Kisan 20 Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वी अपात्र शेतकऱ्यांकडून आधीच्या हप्त्यांची रकमेची वसुली सुरू करण्यात आली आहे.
अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई, वसुली मोहीम सुरू
PM किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. तसेच त्यांच्याकडून मिळालेली रक्कम परत मागवण्यात येत आहे.वसुली मोहिमेला राज्य सरकारचाही पाठिंबा मिळालेला आहे.या मोहिमेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून स्वयंस्फूर्तपणे रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र.अद्याप वसुलीसाठी कोणतीही सक्तीची कायदेशीर तरतूद नसल्यामुळे ही मोहीम फारशी यशस्वी ठरत नाही, असे निरीक्षण आहे.
पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर
सरकारने अपात्र लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी खालील उपाययोजना सुरू केल्या आहेत. जसे कि, जमिनीच्या मालकीच्या नोंदींची तपासणी, 5% लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी, ई-केवायसी (e-KYC) सक्तीची,आधार प्रमाणीकरण आवश्यक, ग्रामपंचायत पातळीवर लाभार्थ्यांची यादी ऑडिट करून सार्वजनिक करणे या टप्प्यांतून अपात्र शेतकऱ्यांची यादी निष्पन्न केली जात आहे, जेणेकरून पारदर्शकतेतून व पात्र लाभार्थ्यांनाच निधी मिळावा याची खात्री होईल.
आतापर्यंत किती वसुली झाली?
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशभरातील अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे 416 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यात उच्च उत्पन्न गटातील शेतकरी, आयकरदाते, केंद्र/राज्य शासकीय कर्मचारी आणि घटनात्मक पदाधिकारी यांचा समावेश आहे.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 10:06 AM IST