Last Updated:
शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. चिकलठाणा शिवारात शेतकरी सूर्यभान नवपुते हे घास शेती करून महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. चिकलठाणा शिवारात शेतकरी सूर्यभान नवपुते हे घास शेती करून महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्याकडे दररोज 6 मजूर या घास काढणीसाठी असतात. या शेतीमुळे त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. शेळी, गाय, म्हैस यांच्यासह विविध जनावरांसाठी चारा म्हणून या घासाचा वापर केला जातो. शेतातून काढलेला घास जिल्ह्यातील बाजारात विकला जातो, असे नवपुते यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
घास शेती करण्यासाठी दिवाळीच्या आसपास म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात शेती मशागत केली जाते, जमीन तयार केल्यानंतर वाफे बनवले जातात. त्यानंतर बी–खत पेरले जाते. साधारणपणे सव्वा–दीड महिन्यानंतर घास काढणीसाठी तयार होतो. काढणी केलेला घास लोडिंग गाडीतून बाजारात नेला जातो. या घासाची 1 पेंडी 6 रुपये प्रति दराने विकली जाते. एक ठोक घास देखील बाजारात विकला जातो. पाऊस चांगला पडल्यानंतर घास काढणीला रोजगार जास्त लागतात.
शेतकऱ्यांनी ठरवले तर घास शेती करता येते, मात्र काहींना ही शेती अवघड वाटते, नवपुते यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या घास शेती केली जात असल्यामुळे त्यांना ही प्रक्रिया सोपी वाटते. घास शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नच नव्हे, तर रोजगार निर्मितीचा एक उत्तम मार्ग म्हणून घास शेतीकडे पाहिले जाऊ शकते. योग्य नियोजन आणि मेहनतीने, शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच अशा पूरक शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
Aurangabad,Maharashtra
June 28, 2025 9:35 PM IST
Framer Success Story: शेतकऱ्याचा शेतीत नवीन प्रयोग, महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न, 6 जणांना रोजगार दिला, Video