By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमिनीचे पोटखराब क्षेत्र 7/12 उताऱ्यातून कसे कमी करायचे? नियम,अटी काय? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमिनीचे पोटखराब क्षेत्र 7/12 उताऱ्यातून कसे कमी करायचे? नियम,अटी काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमिनीचे पोटखराब क्षेत्र 7/12 उताऱ्यातून कसे कमी करायचे? नियम,अटी काय? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/07/03 at 7:16 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 03, 2025 12:23 PM IST

Satbara Utara : शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर (7/12 उतारा) नोंद असलेले पोटखराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो शेतीसाठी योग्य नाही किंवा नापीक आहे. अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे पोटखराब क्षेत्राची आकडेवारी सातबाऱ्यावर जास्त नोंदली जाते.

agriculture news

मुंबई : शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर (7/12 उतारा) नोंद असलेले पोटखराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो शेतीसाठी योग्य नाही किंवा नापीक आहे. अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे पोटखराब क्षेत्राची आकडेवारी सातबाऱ्यावर जास्त नोंदली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना किंवा जमीन विक्री करताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी पोटखराब क्षेत्र कमी करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक असते.

पोटखराब क्षेत्र कमी करण्यासाठी काय करावे?

जर शेतकऱ्याला वाटत असेल की त्यांच्या जमिनीवर नोंदवलेले पोटखराब क्षेत्र प्रत्यक्षात नाही किंवा ते क्षेत्र आता सुधारित आहे, तर त्यांनी अधिकृतपणे महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो.

तहसील कार्यालयात अर्ज द्या

शेतकऱ्याने संबंधित तहसील कार्यालयात एक अर्ज द्यावा लागतो. अर्जात स्पष्ट नमूद करा की आपल्या शेतजमिनीवरील पोटखराब क्षेत्र चुकीचे आहे किंवा आता ती जमीन सुपीक झाली आहे आणि त्यामुळे पोटखराब क्षेत्राची नोंद कमी करावी.

जमीन मोजणीची मागणी करा

पोटखराब क्षेत्र कमी करण्यासाठी शासकीय मोजणी अनिवार्य आहे. यासाठी मोजणी अधिकारी किंवा तलाठ्यांकडे मोजणीसाठी विनंती करावी लागते. मोजणी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर येऊन स्थिती तपासून मोजणी करतो.

प्रत्यक्ष पाहणी आणि नोंद

मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. जमिनीचा प्रत्यक्ष उपयोग, जमीन सुपीकतेची स्थिती, पाणीपुरवठा, पिकांची स्थिती याची नोंद केली जाते.

अहवाल तयार आणि सातबाऱ्यावर दुरुस्ती

मोजणी अधिकाऱ्याचा अहवाल तयार झाल्यावर तो तहसील कार्यालयाकडे दिला जातो. या अहवालाच्या आधारे पोटखराब क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव महसूल खात्याने मंजूर केला, तर सातबारा उताऱ्यावरची नोंद दुरुस्त होते आणि नवीन उतारा मिळतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

जमिनीचा सध्याचा सातबारा उतारा

शेतकऱ्याचा ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)

जमीनधारकाचा फेरफार उतारा (जर वारसांतर झाले असेल तर)

मोजणी शुल्काची पावती (जर शुल्क भरले असेल तर)

जमीन वापराचे प्रमाण दर्शवणारे पुरावे (उदा. शेतीची फोटो, पिकांचे प्रकार)

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 03, 2025 12:19 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

जमिनीचे पोटखराब क्षेत्र सातबाऱ्यातून कसे कमी करायचे? नियम,अटी काय? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article सेवा पीएमआय: जूनमध्ये सेवा क्षेत्राची गती, 10 महिन्यांत उच्च पातळीवर वाढ, नवीन ऑर्डरचे समर्थन – भारत सेवा क्षेत्र जूनमध्ये 10 महिन्यांच्या उच्च आदेशांवर आणि नोकरीच्या वाढीवर 10 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
Next Article दिल्ली उच्च न्यायालयातील पतंजली आयुर्वद धक्के, दबूरविरूद्धची जाहिरात काढून टाकण्याचे निर्देश – दबूर विरुद्ध पटांजली दिल्ली हायकोर्टाने दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंधित केले.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा पॉवर नूतनीकरणयोग्य रणनीती: टाटा पॉवर ग्रीन ग्रोथचा मार्ग दर्शवितो, 3.4 जीडब्ल्यू रूफटॉप क्षमता- टाटा पॉवर ग्रीन ग्रीन ग्रोथ रूफटॉप सौर क्षमता 3 4 जीडब्ल्यू ओलांडते
Business July 5, 2025
इंडिया सीफूड एक्सपोर्ट २०२25: पीएमएमएसवाय अपयशी: भारताची सागरी उत्पादन निर्यात lakh 1 लाख कोटी लक्ष्य होते, जे फक्त ₹ 62 हजार कोटी-सीफूड एक्सपोर्ट लक्ष्यित लक्ष्य गमावले.
Business July 5, 2025
अनंत टेक्नॉलॉजीज उपग्रह: अनंत टेक्नॉलॉजीज भारताची पहिली खासगी सेप्टम कंपनी बनेल, २०२28 देशातील उपग्रह ब्रॉडबँड सेवा देईल- २०२28 पासून भारतात खासगी उपग्रह उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी तंत्रज्ञान
Business July 5, 2025
एआय आणि ग्रीन एनर्जी रिलायन्सचे भविष्य बदलतील, कमाईत जबरदस्त भरती – एआय वर रिलायन्स बेट्स आणि पुढील टप्प्यात वाढीच्या पुढील टप्प्यासाठी ग्रीन एनर्जी
Business July 5, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?