Last Updated:
Satbara Utara : शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर (7/12 उतारा) नोंद असलेले पोटखराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो शेतीसाठी योग्य नाही किंवा नापीक आहे. अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे पोटखराब क्षेत्राची आकडेवारी सातबाऱ्यावर जास्त नोंदली जाते.
मुंबई : शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर (7/12 उतारा) नोंद असलेले पोटखराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो शेतीसाठी योग्य नाही किंवा नापीक आहे. अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे पोटखराब क्षेत्राची आकडेवारी सातबाऱ्यावर जास्त नोंदली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना किंवा जमीन विक्री करताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी पोटखराब क्षेत्र कमी करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक असते.
जर शेतकऱ्याला वाटत असेल की त्यांच्या जमिनीवर नोंदवलेले पोटखराब क्षेत्र प्रत्यक्षात नाही किंवा ते क्षेत्र आता सुधारित आहे, तर त्यांनी अधिकृतपणे महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो.
शेतकऱ्याने संबंधित तहसील कार्यालयात एक अर्ज द्यावा लागतो. अर्जात स्पष्ट नमूद करा की आपल्या शेतजमिनीवरील पोटखराब क्षेत्र चुकीचे आहे किंवा आता ती जमीन सुपीक झाली आहे आणि त्यामुळे पोटखराब क्षेत्राची नोंद कमी करावी.
पोटखराब क्षेत्र कमी करण्यासाठी शासकीय मोजणी अनिवार्य आहे. यासाठी मोजणी अधिकारी किंवा तलाठ्यांकडे मोजणीसाठी विनंती करावी लागते. मोजणी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर येऊन स्थिती तपासून मोजणी करतो.
मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. जमिनीचा प्रत्यक्ष उपयोग, जमीन सुपीकतेची स्थिती, पाणीपुरवठा, पिकांची स्थिती याची नोंद केली जाते.
मोजणी अधिकाऱ्याचा अहवाल तयार झाल्यावर तो तहसील कार्यालयाकडे दिला जातो. या अहवालाच्या आधारे पोटखराब क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव महसूल खात्याने मंजूर केला, तर सातबारा उताऱ्यावरची नोंद दुरुस्त होते आणि नवीन उतारा मिळतो.
जमिनीचा सध्याचा सातबारा उतारा
शेतकऱ्याचा ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)
जमीनधारकाचा फेरफार उतारा (जर वारसांतर झाले असेल तर)
मोजणी शुल्काची पावती (जर शुल्क भरले असेल तर)
जमीन वापराचे प्रमाण दर्शवणारे पुरावे (उदा. शेतीची फोटो, पिकांचे प्रकार)
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 12:19 PM IST
जमिनीचे पोटखराब क्षेत्र सातबाऱ्यातून कसे कमी करायचे? नियम,अटी काय? वाचा सविस्तर