By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय
टॉप स्टोरीज़

Property Rules : तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय

News Desk
Last updated: 2025/07/04 at 8:41 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 04, 2025 1:45 PM IST

Property News : अनेकदा इसारपत्र दिल्यावर मालमत्ता समोरील व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते. मात्र, ठराविक मुदत संपल्यानंतरही काही लोक मालमत्तेचा ताबा सोडायला तयार होत नाहीत.

agriculture news

मुंबई : अनेकदा इसारपत्र दिल्यावर मालमत्ता समोरील व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते. मात्र, ठराविक मुदत संपल्यानंतरही काही लोक मालमत्तेचा ताबा सोडायला तयार होत नाहीत. विशेषतः मूळ मालक परगावी राहत असल्यास किंवा त्यांच्या उपस्थितीचा अभाव असल्यास अशा घटनांचे प्रमाण वाढते. कित्येक वेळा गावातील प्रतिष्ठित लोकांना साक्षीला बोलावले तरी समोरील व्यक्ती मालमत्तेवरचा बेकायदेशीर ताबा सोडण्यास नकार देतात. त्यामुळे मूळ मालकाला कायद्याचा आधार घ्यावा लागतो.

कायद्यानुसार प्रॉपर्टीचा ताबा मिळवणे हा मालकाचा हक्क आहे. परंतु बेकायदेशीररित्या ताबा मिळवणाऱ्यांविरोधात फौजदारी आणि दिवाणी दोन्ही प्रकारच्या कायदेशीर उपाययोजना उपलब्ध आहेत.

फौजदारी कायद्यानुसार कारवाई कशी करता येते?

भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 420 नुसार फसवणूक केल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल करता येतो. मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी समोरील व्यक्तीने फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास हे कलम लागू होते.

तसेच, विश्वासभंग झालेल्या प्रकरणात IPC चे कलम 406 लागू होते. विश्वास संपादन करून मालमत्तेवर ताबा मिळवणे आणि नंतर तो न परत करणे, हा प्रकार विश्वासभंग ठरतो. अशावेळीही थेट पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करता येते. पोलिसांना तक्रारीची शहानिशा करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी लागते.

बनावट कागदपत्रांवर गुन्हा दाखल कसा करावा?

अनेकदा मूळ मालकाच्या नकळत बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी किंवा घरावर बेकायदेशीर ताबा मिळवला जातो. अशा प्रकरणात IPC कलम 467 नुसार गुन्हा दाखल करता येतो. या कलमानुसार बनावट दस्तऐवज तयार करणे हे गंभीर गुन्हा मानले जाते आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा होऊ शकते.

दिवाणी कायद्याचा आधार कोणत्या वेळी घ्यावा?

बेकायदेशीर ताबा काढण्यासाठी आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी दिवाणी कायद्यातील स्पेसीफिक रिलिफ अ‍ॅक्टचे कलम 6 लागू होते. या कलमाचे वैशिष्ट्य म्हणजे जलद न्याय मिळतो. मात्र, यात एक अट आहे. मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

कलम 6 अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात अपील करण्याचा अधिकार नसतो. हे कलम तात्काळ न्यायासाठी वापरले जाते.

प्रमुख बाबी काय?

मालमत्ता मालकाच्या नावावर असली तरी काहीजण ती अनधिकृत ताब्यात घेतात. विश्वासभंग वा फसवणूक झाली असेल, तर IPC 420 आणि 406 कलमांखाली गुन्हा दाखल करता येतो. बनावट कागदपत्रांवर ताबा मिळवला असेल, तर IPC 467 कलमांतर्गत तक्रार दाखल करावी. दिवाणी दावा करण्यासाठी स्पेसीफिक रिलिफ अ‍ॅक्टचे कलम 6 प्रभावी ठरते. यासाठी सहा महिन्यांच्या आत न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे.

मालमत्ता ताब्यात घेण्याचे किंवा विकण्याचे अधिकार कायद्याने स्पष्टपणे ठरवले आहेत. कुणीही बेकायदेशीर ताबा मिळवला असेल, तर पीडित व्यक्तीने प्रकरण दाबून न ठेवता त्वरित कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलावीत, असा सल्ला कायदेतज्ज्ञ देतात.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 04, 2025 1:44 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकार या जमिनी परत करणार, अर्ज कुठे करायचा?
Next Article Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
भारताच्या ग्रीन एनर्जी क्रांतीच्या नेतृत्वासाठी टाटा पॉवर सज्ज आहे, सौर -ईव्हीपासून प्रसारणापर्यंत केलेला एक नवीन विक्रम: चंद्रशेखरन – टाटा पॉवर रेकॉर्ड कामगिरीचे उद्दीष्ट आहे की इंडिया ग्रीन एनर्जी क्रांतीचे नेतृत्व करणे
Business July 4, 2025
ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?