1) शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरावी लागेल. उर्वरित खर्च शासन अनुदानातून दिला जाईल.
2) अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.
3) पंप क्षमतेनुसार 3 HP ते 7.5 HP पर्यंत सौर कृषी पंप उपलब्ध होतील.
4) या पंपांना पाच वर्षांची दुरुस्ती हमी असेल.
1) ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत शेती आहे, त्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेचा पंप मिळू शकेल.
2) 2.50 ते 5 एकर शेतीसाठी 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
3) 5 एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा पंप मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा कमी क्षमतेचा पंप मागता येईल.
4) शेततळे, विहीर, बोअरवेल असलेले शेतकरी किंवा बारमाही पाण्याच्या स्रोताजवळ शेती असलेलेही या योजनेत पात्र राहतील.
5) पाण्याच्या स्रोताची शाश्वतता महावितरणमार्फत तपासली जाईल.
6) जलसंधारण प्रकल्पातून साठवलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.
7) याआधी अटल सौर कृषी पंप योजना-1, योजना-2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सातबारा उतारा (7/12) – यामध्ये पाण्याच्या स्रोताची नोंद असणे आवश्यक.
मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र – 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर.
आधारकार्ड.
शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जात शेतीच्या क्षेत्राची माहिती, पाण्याचा स्रोत, जमिनीचा उतारा आणि वैयक्तिक तपशील भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात येईल. पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 11:15 AM IST
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर