By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!
टॉप स्टोरीज़

Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!

News Desk
Last updated: 2025/06/19 at 11:39 AM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Agriculture Success: सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करत असतात. सोलापुरातील नववी पास शेतकरी शेवगा शेतीतून करोडपती झाला आहे. Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!

Last Updated:June 19, 2025 3:11 PM IST

Agriculture Success: सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करत असतात. सोलापुरातील नववी पास शेतकरी शेवगा शेतीतून करोडपती झाला आहे.

X

Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!

सोलापूर – अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी बऱ्याचदा पिचलेला असतो. परंतु, तरीही हार न मानता काही शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने यशाची उत्तुंग झेप घेतात. अशीच काहीशी कहाणी सोलापूर जिल्ह्यातील एका नववी पास शेतकऱ्याची आहे. घरची गरिबी आणि छपराच्या घरात राहणाऱ्या या शेतकऱ्याला नववीतून शाळा सोडावी लागली. परंतु, त्यानंतर शेवगा शेतीनं त्यांचं नशीबच पालटलं. आता उपळाई खुर्दचे शेतकरी बाळासाहेब पाटील हे करोडपती असून त्यांच्यावर एक पुस्तक देखील प्रकाशित झालंय. याच शेतकऱ्याची यशोगाथा लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

माढा तालुक्यात सर्वात मोठं उजनी धरण आहे. याच तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे शेतकरी बाळासाहेब पाटील यांचं गाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि घर छपराचं अशी स्थिती असतानाच त्यांना नववीतून शाळा सोडावी लागली. तेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘धरण उशाला कोरण घशाला’ अशी स्थिती होती. पाणी नसल्याने शेती कोणती करावी, असा प्रश्न त्यांना पडलेला होता. तेव्हा त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची माहिती घेतली आणि शेवगा शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला एका एकरात त्यांनी शेवगा पिकाची लागवड केली.

वर्षाला लाखोंची कमाई

एका एकरात लागवड केलेल्या शेवगा शेतीतून बाळासाहेब पाटील यांना चांगला नफा मिळाला. त्यामुळे गेल्या बारा वर्षापासून ते 5 एकरात शेवगा शेती करत आहेत. त्यानंतर शेवग्याच्या बिया बनवून त्या विकण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. आज ते संपूर्ण देशभरात शेवगा बियाण्यांची विक्री करत आहे. तर स्वतःचा राम गणेश बियाणे म्हणून ब्रँड देखील उभा केला आहे. या व्यवसायातून नववीपर्यंत शिक्षण घेतलेले बाळासाहेब पाटील हे वर्षाला 25 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

बाळासाहेब पाटील यांनी शेवगा शेतीतून मिळालेल्या यशामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर त्यांच्यावर डॉ. सचिन चंद्रकांत फुगे यांनी ‘शेवग्याच्या झाडातून देशयात्रा’ असे पुस्तक देखील लिहिले आहे. बाळासाहेब यांच्यावर लिहिलेले पुस्तक हे इतर शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरत आहे. या पुस्तकामध्ये शेवगा लागवडीपासून ते येणारा सर्व खर्चापर्यंत माहिती उपलब्ध आहेत.

दरम्यान, घरासमोर किंवा शहरात सहज मिळणाऱ्या या शेवगा शेतीतून एखादा शेतकरी करोडपती बनू शकतो हे बाळासाहेब पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नववी पास शेतकऱ्याचा हा प्रवास युवा शेतकऱ्यांची नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 19, 2025 3:11 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!

TAGGED: agriculture success, balasaheb patil farmer, local18, Shevga farming, shevga seeds business, shevga sheti, solapur farmer, solapur farmer success story, कृषी, बाळासाहेब पाटील, शेतकरी यशोगाथा, शेवगा शेती
Previous Article कृषी हवामान : पावसाचा रुद्रावतार! नाशिक, पुणेसह रायगडमध्ये नदी नाल्यांना पुराचे स्वरूप
Next Article Flower Farming: पारंपरिक पिकाला फाटा, या गावातील शेतकऱ्यांनी निवडला फूलशेतीचा मार्ग, एकरी 4 लाखांचा नफा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?