By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती
टॉप स्टोरीज़

Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

News Desk
Last updated: 2025/05/05 at 6:53 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Turmeric Farming: कोणत्याही पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीच्या निवडीपासून त्याचे व्यवस्थापन गरजेचे असते. हळदीच्या पिकासाठीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

Last Updated:April 22, 2025 2:51 PM IST

Turmeric Farming: कोणत्याही पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीच्या निवडीपासून त्याचे व्यवस्थापन गरजेचे असते. हळदीच्या पिकासाठीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

X

Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

प्रीती निकम, प्रतिनिधी

सांगली: कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी योग्य जमिनीची निवड करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. जमिनीचा पोत, प्रकार आणि पीएच उत्पादन वाढीवर परिणाम करतो. बऱ्याचदा जमिनीची निवड करताना शेतकऱ्यांची फसगत होते. यामुळे पिकाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांच्या मेहनतीला देखील फटका बसतो. दुष्परिणाम टाळण्यासाठी पिकानुसार शास्त्रीय माहितीच्या आधारे योग्य जमिनीची निवड करणं फायदेशीर ठरतं. हळद लागवडीपूर्व व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून जाणून घेऊ.

हळद लागवडीसाठी जमिनीची निवड

हळद पिकाच्या लागवड पूर्व व्यवस्थापनामध्ये जमिनीची निवड, बियाणाची निवड यासह पूर्व मशागतीची पध्दत चांगल्या उत्पादनावर परिणामकारक ठरते. जमिनीची निवड करत असताना चुनखडीची जमीन पूर्णतः टाळावी. हळदीच्या पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन उत्तम ठरते. तसेच मध्यम ते भारी जमीन असेल तरी चालेल. माळरानाची जमीन देखील चालते. परंतु, त्यामध्ये मुरमाचे प्रमाण जास्त असेल तर अशा जमिनी शेतकऱ्यांनी टाळाव्यात. हळद पिकासाठी जमिनीचा पीएच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा.

लागवडपूर्व मशागत 

15 दिवसांचे अंतर ठेवून जमिनीची उभी- आडवी नांगरट करावी. त्यानंतर हराळी, लव्हाळ्यासारख्या बहुवर्षीय तणांच्या काशा वेचून घ्याव्यात. एकरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. पुन्हा रोटरच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सरी वरंबे किंवा गादीवाफे तयार करावेत.

बियाणे निवड

उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणाऱ्या हळदीच्या जातीची निवड करावी. कुरकुमा लौगा या वाणासह राजापूरी, कृष्णा, सेलम, एकुरपेठा हे उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारे वाण वापरू शकता. शक्यतो संशोधन केंद्राने शिफारस केलेले हळदीचे बियाणे वापरावे.

प्रति हेक्टरी लागवडीसाठी हळदीचे 2250 ते 2500 किलो गड्डे म्हणजेच प्रति हेक्टरी 22 ते 25 क्विंटल बेणे वापरणे आवश्यक आहे. लागवडीकरिता जेठे गोल गड्डेच वापरावेत. जेठे गोल गड्डे नसल्यास साधारणपणे 40 ते 45 ग्रॅम वजनाचे अंगठे गड्डे वापरावेत. 30 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे गड्डे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवडीसाठी निरोगी बेण्यांची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये. परराज्यातून टिश्यूकल्चर द्वारे तयार केलेली रोपे शक्यतो टाळावीत, असे मोहिते-पाटील सांगतात.

Location :

Sangli,Maharashtra

First Published :

April 22, 2025 2:51 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

TAGGED: agriculture news, agriculture tips, halad sheti, haldichi sheti, local18, turmeric cultivation, turmeric farming, turmeric farming tips, कृषी, हळद शेती, हळद शेतीची माहिती, हळदीची शेती
Previous Article भूषण स्टील: सरकार पुढील चरणांचा निर्णय घेईल – पुढील चरणांचा निर्णय घेण्यासाठी भूषण स्टील सरकार
Next Article जीसीसीएस तयार करणारी पुढील पिढी केंद्रे – पुढील पिढीच्या उद्योजकांचे पालनपोषण करण्यासाठी जीसीसीएस हब्स बेबनाव
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?