By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video
टॉप स्टोरीज़

Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video

News Desk
Last updated: 2025/05/02 at 2:19 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरु असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आंबा विक्री करताना हा विचार नक्की करा

Last Updated:May 02, 2025 7:36 PM IST

सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरु असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

X

आंबा विक्री करताना हा विचार नक्की करा

बीड : सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याकडून थेट विक्री केला जाणारा आंबा 80 ते 100 रुपये प्रति डझन दराने विकला जातो आहे तर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा आंबा 160 ते 180 रुपये प्रति डझनपर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याला कमी नफा येत असल्याची खंत कृषी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पादन अधिक असून त्यातच बाजारपेठेतील मागणी तुलनेने कमी झाल्याने दरात घट झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी आंब्याची लागवड, त्याची निगा राखणे, तोडणी आणि साठवणूक हे सर्व कामे पार पाडून जेव्हा तो विक्रीसाठी पुढे जातो तेव्हा कृषी उत्पादन सेवा क्षेत्रात प्रवेश करते. मात्र त्याचा मुख्य लाभ व्यापाऱ्यांना जातो.

या पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक महादेव बिक्कड म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने केवळ घाऊक विक्री करण्यावर भर न देता किरकोळ विक्रीचा मार्ग स्वीकारावा. शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याची थेट बाजारपेठेत विक्री केल्यास त्यांना अधिक नफा मिळू शकतो. यासाठी स्थानिक बाजार, हाट, प्रदर्शन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स अशा माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.

फक्त आंब्याची विक्री न करता, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असेही बिक्कड यांचे मत आहे. आंब्यापासून लोणचे, आमसूल, जॅम, ज्यूस, स्क्वॅश, सॉस इत्यादी उत्पादने बनवून त्याची विक्री केल्यास मूल्यवर्धन होऊन उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे फळांचे संपूर्णतः उपयोग करता येतो आणि वाया जाण्याची शक्यता देखील कमी होते.

शेवटी शेतकऱ्यांनी आंबा विक्रीत आत्मनिर्भर व्हावे आणि प्रक्रिया उद्योगाशी स्वतःला जोडून अधिक कमाई करण्याचे मार्ग शोधावे. शासनानेदेखील या दृष्टीने प्रशिक्षण, अनुदान व विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकेल. बाजारपेठेतील स्पर्धा वाढत असताना स्वतःचे ब्रँड निर्माण करणे हेही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Location :

Bid,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video

TAGGED: agriculture, Beed, farmers price for mango, Hapus price, mango price, todas mango price market, todays mango price, आजचे आंबा दर, आजचे आंबा दर मार्केट, आंबा दर, कृषी, बीड, शेतकऱ्याचा आंब्याला भाव
Previous Article करण अदानी यांचे निवेदन: दर युद्धाच्या दरम्यान भारतातील व्यापारात वाढ – टॅरिफ वॉर दरम्यान भारतातील करण अदानिस स्टेटमेंट ट्रेड वाढते
Next Article मॅरिको लाभांश:% ००% डिव्हिडची घोषणा, पॅराशूट ब्रँडसह कंपनीने रेकॉर्ड आणि देय तारीख जाहीर केली – मॅरिकोने वित्तीय वर्ष २ for साठी Final०० अंतिम डिव्हिडंड घोषित केले.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?