वडीलांची मालमत्ता दोन प्रकारांची असते जसे की, पूर्वजांची (Ancestral Property)
आणि स्वतःची कमावलेली (Self-acquired Property) पूर्वजांच्या मालमत्तेत मुलांचा नैसर्गिक अधिकार असतो, तर स्वतःच्या कमाईतून तयार केलेल्या मालमत्तेवर वडिलांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
कोणत्या परिस्थितींमध्ये हक्क गमावला जातो?
जर वडिलांनी त्यांच्या स्वकमाईच्या मालमत्तेसंदर्भात इच्छापत्र लिहिले असेल आणि त्यामध्ये विशिष्ट मुलगा किंवा मुलगी वगळली असेल, तर त्या व्यक्तीला त्या मालमत्तेवर कोणताही हक्क राहात नाही.
कोर्टात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत जिथे पालकांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्या मुलांवरून त्यांचा वारसाहक्क काढून घेण्यात आला. ‘Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007’ नुसार, जर मुलगा/मुलगी पालकांची काळजी घेत नसेल किंवा त्यांच्यावर अन्याय करत असेल, तर त्यांना मालमत्तेतून बेदखल करण्याचा अधिकार पालकांना आहे.
जर वडिलांनी कोणाला कायदेशीररीत्या दत्तक दिले असेल, तर जैविक मुलांचा हक्क संपतो आणि दत्तक मुलालाच वारसाहक्क प्राप्त होतो.
कधी कधी वडील कायदेशीररित्या त्यांच्या मुलाला ‘disown’ करतात, म्हणजेच त्यांच्याशी नातं संपवतात. अशा वेळी मुलाचा वडिलांच्या स्वतःच्या मालमत्तेवर कोणताही हक्क राहत नाही.
कधी कधी मुलं स्वतःहून हक्काचा त्याग करतात आणि लेखी स्वरूपात नोंद देतात. अशा वेळी त्या मुलाचा मालमत्तेवर अधिकार संपतो.
पूर्वजांच्या मालमत्तेत मुलांचा नैसर्गिक अधिकार असतो, आणि तो सहजपणे काढून घेता येत नाही. मात्र वडिलांनी जर त्या मालमत्तेचा हिस्सा विकत घेतलेला असेल आणि ती स्वकमाईत बदललेली असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकाराचा भाग ठरतो.
दरम्यान, मुलांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आहे, हे जरी खरं असलं, तरी त्या हक्काला काही कायदेशीर मर्यादा आहेत. जर मुलाने वडिलांशी दुरावलेले संबंध ठेवले, अपमान केला किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर वडिलांना त्याचा हक्क काढून घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने वेळोवेळी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणे महत्वाचे ठरते.
Mumbai,Maharashtra
July 16, 2025 1:29 PM IST
पर्याय नाही! हे मुलं वडिलांच्या मालमत्तेवरचा हक्क गमावणार, नियम काय सांगतो?