नागरिकांना विक्री करता न येणाऱ्या जमिनी कोणत्या?
शेती उपयोगासाठी असलेली जमीन
ही जमीन फक्त शेतकरी किंवा शेतीविषयक व्यवसाय करणाऱ्यालाच विकता येते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार, अशेती करणाऱ्या व्यक्तीला कृषिक जमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे नॉन-अॅग्रीकल्चरल (NA) प्रमाणपत्राशिवाय विक्री करणे कायदेशीर ठरत नाही.
गायरान, देवस्थान, व वस्तीगटातील सरकारी जमीन
गावात सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेली जमीन जसे की, गायरान, देवस्थान (देवळाची जमीन), स्मशानभूमी किंवा जलस्रोताजवळील जागा, ही जमीन कोणत्याही प्रकारे खाजगी मालकीखाली किंवा विक्रीसाठी उपलब्ध नसते.
ईनामी व वतनदार जमिनी
पूर्वीच्या काळात ईनाम किंवा वतन म्हणून मिळालेल्या जमिनींवर विक्रीस मर्यादा असतात. अशा जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी आवश्यक असते, अन्यथा व्यवहार बेकायदेशीर ठरतो.
भूमिहीन आदिवासींसाठी आरक्षित जमीन
अनुसूचित आदिवासींना मिळालेली जमीन फक्त आदिवासी व्यक्तीलाच विकता येते. ही जमीन अन्य कोणा गैरआदिवासी व्यक्तीला विकणे प्रतिबंधित आहे. या प्रकारातल्या जमिनींच्या विक्रीसाठी अनुमती, फेरविकास किंवा जिल्हा परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता असते.
सीलिंग कायद्यानुसार अधिग्रहित जमीन
कोणत्याही व्यक्तीच्या मालकीतील जास्त क्षेत्रफळ असलेली जमीन जर Ceiling Limit अंतर्गत सरकारी ताब्यात गेली असेल, तर ती जमीन व्यक्तिगत व्यवहारासाठी वापरता येत नाही.
सुरक्षा/संरक्षण क्षेत्रातील जमीन
लष्कर, रेल्वे, वायुदल, किंवा इतर संरक्षण विभागाच्या सीमा क्षेत्रात येणारी जमीन सुरक्षेच्या कारणास्तव खास परवानगीशिवाय विकता येत नाही.
जमिनीची खरेदी, विक्री करताना काय काळजी घ्यावी?
सातबारा, 8 अ, फेरफार उतारा, मालकी हक्काची नोंदणी तपासावी.
जमीन NA (नॉन अॅग्रीकल्चरल) आहे की नाही हे निश्चित करावे.
बांधकाम क्षेत्रात असेल तर टाउन प्लॅनिंग विभागाची मंजूरी घ्यावी.
कोर्ट खटले, वाद, कर्ज किंवा बंधन नाही ना हे पाहावे.
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 11:59 AM IST
तुम्हाला या जमिनींची विक्री करण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य! अन्यथा कारवाई, वाचा नियम