कोणत्या कारखान्यांविरोधात कारवाई?
केदारेश्वर सहकारी साखर कारखाना (अहिल्यानगर, जिल्हा)
थकीत रक्कम: 25 कोटी 76 लाख रुपये
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना (इंदापूर, पुणे)
थकीत रक्कम: 8 कोटी 58 लाख 54 हजार रुपये
भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (लवंगी, सोलापूर)
थकीत रक्कम: 1 कोटी 27 लाख 54 हजार
भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (आलेगाव, सोलापूर)
थकीत रक्कम: 2 कोटी 25 लाख 9 हजार
भीमा सहकारी साखर कारखाना (टाकळी सिकंदर, सोलापूर)
थकीत रक्कम: 1 कोटी 26 लाख 27 हजार
समृद्धी शुगर्स लि. (रेणुकानगर, घनसावंगी, जालना)
थकीत रक्कम: 13 कोटी 63 लाख 42 हजार
डेक्कन शुगर्स प्रा. लि. (मंगलोर, यवतमाळ)
थकीत रक्कम: 1 कोटी 11 लाख 9 हजार
पेनगंगा शुगर फॅक्टरी प्रा. लि. (वरुडधाड, बुलढाणा)
थकीत रक्कम: 2 कोटी 74 लाख 9 हजार
जप्तीची कार्यवाही कशी होणार?
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार, या कारखान्यांनी थकीत एफआरपी वेळेत भरली नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (Revenue Recovery Certificate – RRC) कारवाई सुरू करावी असे निर्देश आहेत. कारखान्यांची साखर, मोलॅसिस (गूळसाखर द्रव), बगॅस (ऊसाचा चोथा) यासारख्या उत्पादनांची जप्ती करून त्यांची विक्री करण्यात येईल आणि त्यातून शेतकऱ्यांचे पैसे वसूल केले जातील.
15 टक्के व्याजासह वसुली
साखर आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे की, ही रक्कम 15% व्याजासह वसूल करण्यात येणार असून, यापुढे एफआरपी थकीत ठेवणाऱ्या कोणत्याही साखर कारखान्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.
Mumbai,Maharashtra
June 22, 2025 2:45 PM IST