Last Updated:
Agriculture News : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील लाखो नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत पहिल्यांदा घर बांधणाऱ्या कुटुंबांना 2.67 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.
मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील लाखो नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत पहिल्यांदा घर बांधणाऱ्या कुटुंबांना 2.10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. त्या अनुदानामध्ये राज्य सरकारकडून आता नव्याने वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनेक कुटुंबांनी आपले हक्काचे घर स्वप्नपूर्ती केली आहे. मात्र, अजूनही बरेच अर्जदार असे आहेत ज्यांचे नाव लाभार्थी यादीत आलेले नाही आणि यामागील कारणेही त्यांना माहीत नाहीत. जर तुमचेही नाव यादीत आलेले नसेल, तर योग्य ती माहिती मिळवणे आणि उणीव दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळेच नाव का आलेले नाही हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत नाव येण्यासाठी काही अटी आणि निकष पूर्ण करणे आवश्यक असते. हे निकष पुढीलप्रमाणे आहेत. जसे की, अर्ज भरताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे. घराच्या मालकीत महिलांचेही नाव असणे गरजेचे आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख, 6 लाख किंवा 12 लाख रुपयांपर्यंतच्या तीन श्रेणींमध्ये असणे आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत आहे.
कमी उत्पन्न गट (LIG) – उत्पन्न 3 ते 6 लाख रुपयांदरम्यान असलेले कुटुंब.
मध्यम उत्पन्न गट I (MIG-I) – उत्पन्न 6 ते 12 लाख रुपयांपर्यंत.
मध्यम उत्पन्न गट II (MIG-II) – उत्पन्न 6 ते 12 लाख रुपयांमध्ये असलेले कुटुंब.
यासोबतच अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग आणि महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया आता सोपी झाली आहे. अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून प्रधानमंत्री आवास योजना अॅप डाउनलोड करा. त्यानंतर मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा. तुमच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) येईल. OTP टाकून लॉगिन करा. पुढे अर्ज करताना नाव, पत्ता, आधार क्रमांक, उत्पन्न व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरावी लागते.
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी https://pmaymis.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा. तेथे ‘Search Beneficiary’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचे नाव किंवा आधार क्रमांक टाकून यादी तपासा. जर तुमचे नाव यादीत नसेल, तर सर्व माहिती पुन्हा तपासा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा आणि तांत्रिक अडचणी असल्यास स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अशा प्रकारे आवश्यक पावले उचलली, तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
Mumbai,Maharashtra
July 06, 2025 12:19 PM IST
तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करूनही लाभार्थी यादीत नाव येत नाही? वाचा त्यामागचे कारणे