Last Updated:
Agriculture News : आधार कार्ड ही आजच्या घडीला प्रत्येक नागरिकासाठी एक अत्यावश्यक ओळखपत्र ठरली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, बँक व्यवहार असो, किंवा इतर कुठलीही प्रक्रिया आधार कार्डशिवाय काहीही अशक्य झालं आहे.
मुंबई : आधार कार्ड ही आजच्या घडीला प्रत्येक नागरिकासाठी एक अत्यावश्यक ओळखपत्र ठरली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, बँक व्यवहार असो, किंवा इतर कुठलीही प्रक्रिया आधार कार्डशिवाय काहीही अशक्य झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा, सरकारी योजनांचे अनुदान थांबण्याचा धोका निर्माण होतो.
आधार आणि बँक खाते लिंक असणे का गरजेचे?
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांमधून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे अनुदान मिळते. या प्रणालीखाली,पैसे थेट आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होतात. जर शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले नसेल, तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, आणि शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहू शकतो.
कृषी विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, फार्मर आयडी कार्डमध्ये देखील आधारशी जोडलेल्या खात्याचीच माहिती देणे अनिवार्य आहे.
आधार लिंक केले नाही तर काय होणार?
शेतकऱ्याने आधारशिवाय बँक खात्याची माहिती दिल्यास अनुदान रक्कम अडचणीत येऊ शकते. डीबीटी प्रणालीत फक्त आधार लिंक असलेले खाते वैध मानले जाते.त्यामुळे योग्य ती लिंकिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास अनुदान रोखले जाऊ शकते.
आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करावे?
शेतकऱ्यांनी आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन संबंधित बँकेत जावे. बँकेतील अधिकाऱ्यांमार्फत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल.ऑनलाइन बँकिंग सुविधा असलेल्या खातेदारांनी इंटरनेट बँकिंगद्वारेही लिंकिंग करू शकतात. एकदा लिंकिंग पूर्ण झाल्यावर ही माहिती कृषी डेटाबेसमध्ये अपडेट करणे गरजेचे आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावं की आपलं बँक खाते आधारशी लिंक झालेलं आहे की नाही. हे लिंक केल्यानंतर फार्मर आयडी किंवा इतर कृषी योजना पोर्टल्सवर अपडेट करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 23, 2025 11:46 AM IST