By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू,या सुविधा मिळणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू,या सुविधा मिळणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू,या सुविधा मिळणार

News Desk
Last updated: 2025/06/22 at 12:07 PM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:June 22, 2025 8:29 AM IST

Agriculture News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपांसंदर्भातील तांत्रिक अडचणी आणि समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे.

agriculture news

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपांसंदर्भातील तांत्रिक अडचणी आणि समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. आतापर्यंत राज्यात 5.65 लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले असून, आगामी काळात आणखी 5 लाख नवीन सौर पंप बसवण्याचे नियोजन आहे.

तक्रारींसाठी सोपी आणि मोफत सेवा

पावसाळ्यात आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे सौर पंपांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. सौर पॅनेल्सचे तांत्रिक बिघाड, पंप बंद पडणे, पाण्याचा दाब कमी होणे, तसेच उपकरणांची चोरी. या समस्यांवर तत्काळ उपाय मिळावा, म्हणून MSEDCL ने 1800-233-3435 आणि 1800-212-3435 हे टोल-फ्री क्रमांक आणि www.mahadiscom.in/solar_MTSKPY हे विशेष पोर्टल कार्यान्वित केले आहे.

ऑनलाइन आणि कॉल द्वारे तक्रार नोंदणी

शेतकरी आता घरबसल्या या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून किंवा अधिकृत पोर्टलवर लॉगइन करून आपली तक्रार सहज नोंदवू शकतात. तक्रार नोंदवताना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, लाभार्थी क्रमांक, तसेच गाव, तालुका व जिल्ह्याची माहिती देणे आवश्यक आहे.

पंपांसाठी विमा संरक्षण व तीन दिवसात सेवा द्यावी लागणार

या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक सौर पंपाला विमा संरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किंवा दुरुस्ती त्वरित केली जाईल. तक्रार नोंदविल्यानंतर 3 दिवसांच्या आत संबंधित पुरवठादार कंपनीने समस्या सोडवणे अनिवार्य आहे. MSEDCL ने सर्व पुरवठादार कंपन्यांना जिल्हानिहाय सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत. तक्रार सोडवल्यानंतर शेतकऱ्यांना SMS द्वारे सूचना मिळणार असून, यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वास वाढेल.

MSEDCL कडून शेतकऱ्यांना आवाहन

MSEDCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी शेतकऱ्यांना या सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचणार असून, सौर पंपांच्या देखभाल-दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरेल. यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वापरण्यास अधिक प्रोत्साहन मिळेल आणि शेती उत्पादनातही वाढ होईल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 22, 2025 8:29 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार

TAGGED: agriculture, agriculture news, saur krushi pump yojana, solar pump yojana, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ऑनलाईन फसवणूक नियंत्रित केली जाईल, आरबीआय ऑनलाईन फसवणूकीला आळा घालण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म – आरबीआय आणेल
Next Article बीएस स्पेशलः इस्त्राईल-एअर-रुस वॉर आणि इंडियाचे क्रूड ऑइल सेटलमेंट-बीएस विशेष इस्त्राईल इराण यूएस वॉर आणि इंडिया क्रूड ऑइल लँडस्केप
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?