भारतातील सर्वात महागडं लाकूड
सध्या चंदन हे देशात सर्वाधिक किमतीचं लाकूड मानलं जातं. बाजारात याचा दर प्रती किलो 12,000 ते 15,000 रुपये इतका आहे. एका चंदनाच्या झाडापासून सरासरी 15 ते 20 किलो लाकूड मिळते. म्हणजे एका झाडावरून तुम्ही लाखो रुपयांचा नफा सहज मिळवू शकता. मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास हा नफा कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
लागवड कशी करायची?
संपूर्ण किंवा आंतरपीक पद्धतीने लागवड करता येते. तुमच्या संपूर्ण शेतात किंवा फक्त बांधावर चंदन लागवड करता येते. त्यामुळे इतर पिकांबरोबरही ही शेती शक्य आहे याला आंतरपीक शेती म्हणतात.
पाण्याची कमी गरज
चंदन झाडांना फारसं पाणी लागत नाही. कमी सिंचनाच्या भागातही ही शेती उत्तम प्रकारे करता येते.
होस्ट प्लांटचा वापर गरजेचा
चंदन हे अर्ध परजीवी झाड आहे. यासाठी त्यासोबत होस्ट प्लांट लावणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ अधिक प्रभावी होते.
स्वच्छता आणि व्यवस्थापन
चंदनाच्या आजूबाजूची स्वच्छता राखणे आणि कीडरहित वातावरण ठेवणे झाडाच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे.
लागवडीचा कालावधी आणि खर्च
चंदन लागवडीसाठी कोणताही ठराविक हंगाम नाही.तुम्ही वर्षभरात कधीही लागवड करू शकता. 2 ते 2.5 वर्षांचे रोपे लावणे उत्तम. चंदनाचे रोपांची किंमत 100 रु ते 130 रु आहे.
सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रिया
सुरुवातीच्या 8 वर्षांत चंदनाला विशेष सुरक्षा आवश्यक नसते. पण त्यानंतर झाड सुगंधी होऊ लागते आणि त्याची बाजारात मागणी वाढते.सध्या सरकारने चंदनाची खाजगी विक्री बंद केली आहे. त्यामुळे चंदन विक्री केवळ सरकारी यंत्रणांमार्फतच करता येते. यासाठी योग्य नोंदणी, परवानग्या आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे गरजेचे आहे.
(टीप : चंदन शेती सुरू करण्याआधी स्थानिक वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 1:36 PM IST
आयुष्यभराची एकदाच कमाई! या झाडांची लागवड करा, किलोला 20,000 रु भाव, वर्षाला कमवा बक्कळ पैसा