By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : MahaDBT पोर्टलवर शेतकरी गटाची नोंदणी कशी केली जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : MahaDBT पोर्टलवर शेतकरी गटाची नोंदणी कशी केली जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : MahaDBT पोर्टलवर शेतकरी गटाची नोंदणी कशी केली जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/07/06 at 11:35 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 06, 2025 2:14 PM IST

Agriculture News : शेतकरी गटांना आधुनिक शेतीत मदत मिळावी, उत्पादन वाढावे आणि नवे प्रयोग करता यावेत, यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टलवरून पिक प्रात्यक्षिके या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

agriculture news

मुंबई : शेतकरी गटांना आधुनिक शेतीत मदत मिळावी, उत्पादन वाढावे आणि नवे प्रयोग करता यावेत, यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टलवरून पिक प्रात्यक्षिके या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज सादर करण्यापासून ते मंजुरीपर्यंत काही महत्त्वाचे टप्पे पार करावे लागतात. शेतकरी गटांना अर्ज करताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल? आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

नोंदणी आणि लॉगिन

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी गटाने प्रथम आपली नोंदणी करणे गरजेचे असते. यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत. जसे की, ‘विद्यमान शेतकरी गट’ व ‘नवीन शेतकरी गट’.

ज्या गटांनी 31 मार्च 2025 पूर्वी पोर्टलवर नोंदणी केली असेल, त्यांनी ‘विद्यमान शेतकरी गट’ पर्याय निवडावा आणि आपला युजरनेम, पासवर्ड वापरून लॉगिन करावे. नवीन नोंदणीसाठी गटातील कोणत्याही एका सदस्याचा फार्मर आयडी वापरून पहिल्यांदा लॉगिन करावे लागते. नोंदणीनंतर गटाचे अध्यक्ष, सचिव आणि अधिकृत सदस्य यांच्या फार्मर आयडीचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करणे अनिवार्य असते.

अर्ज सादर करणे

नोंदणी पूर्ण झाल्यावर अधिकृत सदस्याच्या आयडीने लॉगिन करावे. त्यानंतर पिक प्रात्यक्षिक घटकासाठी अर्ज भरावा. अर्ज सादर करताना सविस्तर माहिती देणे आवश्यक असते – जसे की गटातील सदस्यांची यादी, शेताचा तपशील, लागवडीचे क्षेत्रफळ, अपेक्षित उत्पादन इत्यादी.

प्राथमिक निवड आणि माहिती भरणे

अर्ज सादर झाल्यावर ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (FCFS)’ तत्वावर अर्जदारांची प्राथमिक यादी तयार केली जाते. यादीत नाव आल्यावर गटाने पुन्हा लॉगिन करून गटातील सर्व सदस्यांची माहिती बारकाईने भरावी. ही माहिती पुढील छाननीसाठी फार महत्त्वाची ठरते.

अर्जाची छाननी आणि अंतिम मंजुरी

तहसील कार्यालयाकडून अर्ज पोर्टलवर प्राप्त झाल्यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून तपासणी केली जाते. या प्रक्रियेत अर्जदार गटाने दिलेली माहिती खरी आहे का, याची खातरजमा होते. यानंतर सार्वजनिक जाहीर सूचना दिली जाते, जेणेकरून कुणाला आक्षेप असेल तर तो मांडता येईल. छाननीनंतर सर्व काही व्यवस्थित आढळल्यास अर्जाला अंतिम मंजुरी दिली जाते.

अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

अर्ज करताना प्रत्येक वेळी फक्त अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरावा लागतो.

अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीही याच आयडीने लॉगिन करावे. पूर्वी नोंदणीकृत गटांनी आपले ‘युजरनेम व पासवर्ड’ व्यवस्थित जतन करणे गरजेचे असते. नव्याने नोंदणी करणाऱ्यांनी गटातील सदस्यांची माहिती पूर्ण व अचूक भरावी.

या प्रक्रियेमुळे शेतकरी गटांना त्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके राबवण्यासाठी सरकारी सहाय्याचा लाभ सहज मिळवता येतो. पिकांची उत्पादकता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 06, 2025 2:14 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

MahaDBT पोर्टलवर शेतकरी गटाची नोंदणी कशी केली जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, mahadbt, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पहिल्या सहामाहीत वेगवेगळ्या ईव्ही आणि एसयूव्ही मॉडेल्सवर भारी सूट, ऑटो कंपन्यांनी सवलतीच्या बॉक्स उघडल्या – एसयूव्ही इव्ह वर ऑटो सवलत वाढ
Next Article गुंतवणूकदार लक्ष देतात! अदानी एंटरप्राइजेज एनसीडीमार्फत ₹ 1000 कोटी वाढवतील, 9 जुलैपासून हा मुद्दा उघडेल – अदानी एंटरप्राइजेजने गुंतवणूकदारांना 9 30 टक्क्यांपर्यंतचे उत्पन्न मिळवून एनसीडी ऑफर सुरू केली आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आळशी वाढीपासून ट्रेंटच्या समभागांवर दबाव – आळशी वाढीमुळे ट्रेंट्सच्या शेअर्सवर दबाव
Business July 6, 2025
सौर ऊर्जा सेक्टर कंपनी एमव्ही फोटोव्होल्टिक ₹ 3000 कोटी आयपीओ, सेबीने डीआरएचपी दाखल केली आहे – सौर फर्म एमव्ही फोटोव्होल्टिक पॉवर फाइल्स डीआरएचपी एसबीआय सह 3000 कोटी रुपयांना आयपीओमध्ये
Business July 6, 2025
स्पष्टीकरणकर्ता: भारतीय पंतप्रधानांनी years 57 वर्षानंतर अर्जेटिनाला भेट दिली, पंतप्रधान मोदींची रणनीती म्हणजे काय – स्पष्टीकरणकर्ता years 57 वर्षानंतर पंतप्रधान मोडिस रणनीती काय होते.
Business July 6, 2025
Agriculture News : 18 जुलैला PM Kisan चा 20 वा हप्ता खात्यात जमा होणार? नवीन अपडेट आली समोर
टॉप स्टोरीज़ July 6, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?