या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रु चा लाभ तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यावर जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही निकष पूर्ण केले पाहिजेत आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरलेला असावा लागतो.
सर्व शेतकरी या योजनेत पात्र नाहीत. खालील अटी पूर्ण करणारेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात
अर्जदाराच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने सरकारी नोकरीत नसावे, तसेच तो आयकर दाता नसावा.
10,000 पेक्षा जास्त पेन्शनधारक, तसेच डॉक्टर, अभियंते, वकील, आर्किटेक्ट, सीए यांसारखे व्यावसायिक देखील या योजनेसाठी अपात्र मानले जातात. एखादा शेतकरी सहकारी संस्था किंवा इतर संस्थेद्वारे शेती करत असला तरी जमीन त्याच्या नावावर नसल्यास लाभ मिळणार नाही.
आधार कार्ड – ओळख आणि पडताळणीसाठी आवश्यक.
सातबारा उतारा / जमीन मालकीचे पुरावे – जमीन आपल्या नावावर असल्याचे दर्शवणारे दस्तऐवज.
बँक पासबुकची प्रत – हप्त्यांची रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी.
मोबाईल नंबर – अर्जाची स्थिती, हप्त्याचे अपडेट्स यासाठी आवश्यक.
राज्यानुसार इतर दस्तऐवज – काही राज्यांत अतिरिक्त माहितीची मागणी होऊ शकते.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक टाका आणि नोंदणी सुरू करा.
तुमची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, बँक तपशील, आणि मोबाईल नंबर भरा.
सर्व कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
तसेच ऑफलाइन अर्जासाठी, तुम्ही जवळच्या CSC सेंटर (Common Service Centre) किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता.
शेतकऱ्यांची माहिती आधारशी संलग्न (linked) असणे आवश्यक आहे.
बँक खात्याची नोंदणी अचूक असली पाहिजे.
कोणत्याही अपात्रतेचे निकष लागू होत असल्यास हप्ता थांबू शकतो.
Mumbai,Maharashtra
July 13, 2025 12:06 PM IST