राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या ठिकाणी शेतकरी कुठूनही आणि कधीही ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणी पूर्ण केल्यानंतर अर्जाची स्थिती पोर्टलवर सहज तपासता येते.
प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8अ उतारा, आधार संलग्न बँक खात्याचे तपशील, खरेदीची पावती अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. अर्जाच्या प्रत्येक टप्प्यावर एसएमएस आणि ईमेलद्वारे सूचना मिळतात. सर्व अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्जदाराला योजनांच्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. पात्रता तपासणीनंतरच अर्ज मान्य केला जातो. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात, ऑफलाईन अर्जाची सुविधा नाही. पात्रता निकष पूर्ण न झाल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (ठिबक आणि तुषार संच): 45% ते 55% अनुदान
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान / राज्य पुरस्कृत योजना: ट्रॅक्टर व अवजारे – 40% ते 60% अनुदान
राष्ट्रीय कृषी विकास योजना: यांत्रिकीकरण, संरक्षित शेती – 40% ते 60% अनुदान
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य, गळीतधान्य, कापूस): बियाणे व यंत्रे – 50% अनुदान
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना: ठिबक व तुषार संच – 25% ते 30% अनुदान
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शेडनेट, पॉलिहाऊस, पॅक हाऊस – 50% अनुदान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: संत्रा, मोसंबी, आंबा – 100% अनुदान
महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेल्या पात्र अर्जांची निवड पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक लॉटरी प्रणालीद्वारे केली जाते. लॉटरीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी 10 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. कृषी विभागाकडून या कागदपत्रांची तपासणी करून पुढील 10 दिवसांत पूर्वसंमती पत्र दिले जाते.
पूर्वसंमती मिळाल्यावर शेतकऱ्यांनी 30 दिवसांच्या आत संबंधित यंत्र किंवा साहित्य खरेदी करून त्याची पावती व इतर कागदपत्रे पुन्हा पोर्टलवर अपलोड करावी लागतात. अंतिम पडताळणीनंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 11:52 AM IST
महाडीबीटीकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू, अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, वाचा सविस्तर