महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेत किती अनुदान मिळाले, कोणत्या घटकांतून लाभ मिळाला, याची माहिती मिळवता येते. इतकेच नव्हे तर, गावनिहाय लाभार्थ्यांची यादी सुद्धा थेट ऑनलाइन पाहता येते. यामुळे एकाच गावातील इतर शेतकऱ्यांना कोणत्या योजना मंजूर झाल्या आहेत, कोणाचा अर्ज मंजूर झाला आहे? याची माहिती देखील मिळत आहे.
गावनिहाय लाभार्थी यादी कशी तपासायची?
खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही गावातील योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता जसे की, तुमच्या मोबाइल किंवा संगणकावर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाईटला भेट द्या.
‘निधी वितरित लाभार्थी’ हा पर्याय निवडा
पोर्टल उघडल्यानंतर ‘निधी वितरित लाभार्थी’ (Beneficiary with Fund Distributed) या टॅबवर क्लिक करा. हा पर्याय तुम्हाला शेतकऱ्यांना मिळालेल्या निधीची माहिती देतो.
जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
पुढील टॅबवर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर सबमिट करा
यादी तपासा
स्क्रीनवर संबंधित गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल जसे की, अर्ज क्रमांक, अर्जदाराचे संपूर्ण नाव, लाभाचा प्रकार (उदा. सिंचन, बी-बियाणे, सौरपंप इ.) घटकाचे नाव, योजनेचे नाव, वितरित निधीची रक्कम इत्यादी. ही यादी दर काही दिवसांनी अद्ययावत केली जाते. त्यामुळे जर एखाद्या अर्जाची स्थिती अद्याप ‘प्रलंबित’ दाखवत असेल, तर ती भविष्यात ‘स्वीकृत’ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
June 24, 2025 8:29 AM IST
तुमच्या गावात कोणाला मिळाला MahaDBT अनुदानाचा लाभ, मोबाईलद्वारे 2 मिनिटांत करा चेक