अल्पभूधारक शेतकरी कोणाला मानले जाते, हे शासनाने स्पष्टपणे ठरविले आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरांपेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन आहे, त्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी मानले जाते. यासाठी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरची नोंद महत्वाची असते.
ओळखपत्राचा पुरावा – आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.
पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, वीजबिल, पाणीपट्टी, आधार कार्ड, सातबारा उतारा यापैकी एक.
जमिनीची मालकी दर्शविणारे कागदपत्र – सातबारा उतारा किंवा 8 अ उतारा.
तलाठ्यांचा अहवाल – जमिनीची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी आवश्यक.
स्वघोषणापत्र – अर्जासोबत भरून सादर करणे बंधनकारक.
1) सर्वप्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावे.
2) नवीन वापरकर्त्यांनी नोंदणी करून लॉगिन आयडी तयार करावा.
3) लॉगिन झाल्यानंतर महसूल विभाग निवडून ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ या सेवेला क्लिक करावे.
4) अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, शेतीचे तपशील काळजीपूर्वक भरावेत.
5) सर्व कागदपत्रे स्कॅन करून (75 केबी ते 500 केबी आकाराच्या मर्यादेत) पोर्टलवर अपलोड करावीत.
6) अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरावे व मिळालेली पावती जतन करावी.
प्रमाणपत्र मिळण्यासाठी साधारण 15 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीनंतर अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी पुन्हा लॉगिन करून प्रगती पाहता येते. काही कारणाने प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही, तर पोर्टलवर अपील अर्ज सादर करता येतो.
केंद्र सरकारने 2025-16 मध्ये शेतीनिहाय जनगणना केली असून त्यानुसार पाच प्रकारचे शेतकरी वर्ग ठरवण्यात आले आहेत.
1) अत्यल्प भूधारक – 1 हेक्टर (2.5 एकर) पेक्षा कमी क्षेत्र.
2) अल्पभूधारक – 1 ते 2 हेक्टर (2.5 ते 5 एकर).
3) अर्धमध्यम भूधारक – 2 ते 4 हेक्टर (5 ते 10 एकर).
4) मध्यम भूधारक – 4 ते 10 हेक्टर (10 ते 25 एकर).
दरम्यान, राज्यातील हजारो अल्पभूधारक शेतकरी या प्रमाणपत्राच्या आधारे पीक विमा, अनुदान, सिंचन योजना, शेततळे अनुदान, ठिबक सिंचन योजना यांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप हे प्रमाणपत्र नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून पात्रता निश्चित करून घ्यावी.
Mumbai,Maharashtra
July 06, 2025 2:59 PM IST
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे? अर्जप्रकिया, आवश्यक कागदपत्रे, वाचा सविस्तर