मयत व्यक्तीचे नाव कमी करून वारसनोंद करण्यासाठी आवश्यक टप्पे
1) मृत्यू दाखला मिळवणे
वारसनोंद करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित व्यक्तीचा अधिकृत मृत्यू दाखला आवश्यक असतो. हा दाखला स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेमार्फत प्राप्त केला जाऊ शकतो.
2) वारसदारांची माहिती गोळा करणे
मयत व्यक्तीचे सर्व कायदेशीर वारसदार कोण आहेत, हे स्पष्ट करणे आवश्यक असते. वारसदारांमध्ये पती/पत्नी, मुले, मुली, आई-वडील किंवा इतर नातेवाईक समाविष्ट असू शकतात. यासाठी वारस साक्षांकित पत्र (affidavit) किंवा वारस प्रमाणपत्र वापरले जाते.
3) वारस साक्षांकित प्रतिज्ञापत्र
कोर्ट किंवा नोटरीकडून प्रतिज्ञापत्र तयार करून, सर्व वारसदारांनी त्यावर सही करणे आवश्यक असते. यामध्ये मयत व्यक्तीची माहिती, मृत्यू दिनांक, आणि सर्व वारसदारांची नावे नमूद केली जातात.
4) विल (जर उपलब्ध असेल तर)
मयत व्यक्तीने जर कोणताही वसीयतपत्र (Will) तयार केले असेल, तर त्यानुसारही वारसनोंद केली जाऊ शकते. मात्र वसीयत न्यायालयात सिद्ध होणे गरजेचे आहे.
5) आवश्यक कागदपत्रे
वरील सर्व कागदपत्रे एकत्र करून, संबंधित जमिनीच्या तलाठी (पटवारी) यांच्याकडे वारसनोंद साठी अर्ज करावा लागतो. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात.
मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला,सर्व वारसदारांची आधार प्रत,सातबारा उताऱ्याची प्रत, वारस प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र आणि घरफाळा किंवा मिळकत कराची पावती (जर शहरी मालमत्ता असेल तर)
6) तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची पडताळणी
तलाठी प्राप्त कागदपत्रांची तपासणी करून, मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुनावणी घेतो. संबंधित सर्व वारसदारांची उपस्थिती मागवली जाते. या सुनावणीत कोणताही वाद नोंदला गेला नाही, तर पुढील प्रक्रिया सुरू होते.
7) वारसनोंद मंजूरी आणि सातबाऱ्यात नोंद
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तलाठी सातबाऱ्यावरून मयत व्यक्तीचे नाव कमी करून, वारसदारांची नावे नवीन 7/12 उताऱ्यावर नोंदवतो. ही नोंद Mutation Entry किंवा हक्कपत्र म्हणून ओळखली जाते.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 12:58 PM IST