Farmer ID साठी नोंदणी प्रक्रिया
1) नोंदणी (Registration)
शेतकऱ्यांनी प्रथम AgriStack पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यावर त्यांना एक तात्पुरता Farmer ID मिळतो.
2) अर्ज मंजुरी (Approval)
नोंदणीनंतर शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यावरच हा आयडी अधिकृत मानला जातो. परंतु अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप मंजूर न झाल्याने ते योजनांचा लाभ घेण्यात अडचणीत आहेत.
माहिती दुरुस्ती कशी करायची?
जर तुमच्याकडे Farmer ID असला आणि तरीही योजनांचा लाभ मिळत नसेल, तर खालीलप्रमाणे तुमची माहिती तपासा:
AgriStack संकेतस्थळावर लॉगिन करा.
वेबसाईटवर ‘Farmer’ पर्यायावर क्लिक करा.
मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा OTP चा वापर करून लॉगिन करा.
मोबाईल नंबर व्हेरिफाय झालेला आहे याची खात्री करा.
‘View My Information’ वर क्लिक करा
येथे तुमची वैयक्तिक माहिती, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, जमीन संबंधित तपशील दिसतील. चुकीची माहिती असल्यास ‘Edit’ किंवा ‘Update’ करून ती दुरुस्त करा.
Farmer ID शिवाय लाभ शक्य नाही
केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी Farmer ID अनिवार्य केला आहे. त्यामुळे जे शेतकरी Farmer ID नोंदणी करणार नाहीत, त्यांना कोणत्याही सरकारी कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला Farmer ID अपडेट ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Mumbai,Maharashtra
June 10, 2025 8:33 AM IST