Last Updated:
Property News : जमीन अथवा मालमत्तेवरील आपले हक्क स्वेच्छेने सोडून देण्यासाठी ‘हक्क सोडपत्र’ तयार करावे लागते. जमीन व्यवहारात नोंदणीकृत सोडपत्राला कायदेशीर मान्यता असते.
Property News : जमीन अथवा मालमत्तेवरील आपले हक्क स्वेच्छेने सोडून देण्यासाठी ‘हक्क सोडपत्र’ तयार करावे लागते. जमीन व्यवहारात नोंदणीकृत सोडपत्राला कायदेशीर मान्यता असते.
मुंबई : जमीन अथवा मालमत्तेवरील आपले हक्क स्वेच्छेने सोडून देण्यासाठी ‘हक्क सोडपत्र’ तयार करावे लागते. जमीन व्यवहारात नोंदणीकृत सोडपत्राला कायदेशीर मान्यता असते. अनेकदा वारसाहक्क, कौटुंबिक वाद किंवा विभाजन प्रक्रियेत एखादा हक्कदार आपल्या हिस्स्याचा दावा सोडतो, अशावेळी सोडपत्र महत्वाचे ठरते.
सोडपत्र तयार करताना काही ठरावीक पद्धत आणि कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागते. प्रथम, ज्याला हक्क सोडायचा आहे. त्याने ठराविक मुद्यांवर तपशील सादर करावा लागतो. उदाहरणार्थ, हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, हक्काचे स्वरूप, जमीन किंवा मालमत्तेचा तपशील, त्याचा बाजारभाव आणि सोडपत्र स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे तपशील या बाबी स्पष्ट असणे आवश्यक असते.
हक्क सोडपत्र बनवण्यासाठी प्रथम स्थानिक वकील अथवा लेखापालाकडून मसुदा तयार करून घ्यावा लागतो. मसुदा तयार झाल्यानंतर तो स्टँप पेपरवर लिहिला जातो किंवा प्रिंट केला जातो. महाराष्ट्र स्टँप अधिनियमानुसार जमीन किंवा मालमत्ता सोडपत्रासाठी विशिष्ट मुद्रांक शुल्क आकारले जाते. याचे प्रमाण ठराविक मूल्यावर आधारित असते. उदाहरणार्थ, जमीन किंवा सदनिका सोडताना सोडलेल्या हक्काच्या बाजारमूल्याचा 0.5% ते 1% इतका मुद्रांक शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच किमान 500 रुपयांपासून ही रक्कम सुरू होते.
मुद्रांक शुल्क भरल्यानंतर सोडपत्रावर दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी करावी लागते. यासाठी दोन साक्षीदारांची स्वाक्षरी देखील अनिवार्य असते. त्यानंतर हे दस्त स्थानिक उपनिबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करावे लागते. नोंदणी शुल्क स्वतंत्रपणे आकारले जाते. हे शुल्क काही जिल्ह्यांमध्ये किमान 1000 रुपयांपासून सुरु होते आणि जमिनीच्या बाजारमूल्याच्या प्रमाणात वाढते. सरासरी नोंदणी शुल्क बाजारमूल्याच्या 1% पर्यंत असू शकते.
हक्क सोडपत्र तयार करण्याचा एकूण खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो. मुद्रांक शुल्क,नोंदणी शुल्क, वकील किंवा लेखापालांचे शुल्क आणि इतर प्रक्रिया शुल्क.सरासरी पाहता साधारण जमीन सोडपत्रासाठी 4,000 ते 10,000 रुपये खर्च येतो. उच्च मूल्याच्या शहरातील, मोठ्या आकाराच्या जमिनींसाठी हा खर्च आणखी वाढू शकतो.
नोंदणी केलेले सोडपत्र केवळ हक्क सोडणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात वैध राहते. मृत्यूनंतर हे हक्क कायमच संपुष्टात येतात. म्हणूनच कोणतीही शंका असल्यास किंवा कुटुंबीयांमध्ये विवादाची शक्यता असल्यास, तज्ञ वकीलांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
जमिनीचे किंवा मालमत्तेचे हक्क स्पष्टपणे व कायदेशीर रित्या सोडायचे असतील तर सोडपत्र हीच सर्वात सुरक्षित प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे व्यवहाराची पारदर्शकता आणि कागदपत्रांची खात्रीशीरता राखण्यासाठी हे पद्धतशीरपणे करणे महत्त्वाचे ठरते.
Mumbai,Maharashtra
June 30, 2025 11:33 AM IST
जमीन, मालमत्तेचे हक्क सोडपत्र कसे तयार करावे? किती खर्च येतो? वाचा सविस्तर