कोंबड्यांमध्ये अतिसाराची संभाव्य कारणे
जिवाणूजन्य संसर्ग – उदा. साल्मोनेला, ई. कोली
विषाणूजन्य आजार – न्यूकॅसल रोग, ब्राँकायटिस
परजीवी संसर्ग – कोक्सीडिओसिस, आतड्यांतील कृमी
निकृष्ट व दूषित खाद्य, आहारात अचानक बदल, गर्दी व अति उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण, पावसाळ्यातील वातावरण आणि ओलसर परिसर याचा मोठा परिणाम होतो.
अतिसार ओळखण्याची लक्षणे
पातळ, पाणचट किंवा सैल विष्ठा तयार होणे.
दुर्गंधीयुक्त मल व परिसरात घाण होणे.
भूक न लागणे,कमजोरी आणि आळस येणे.
पिसे गळणे, एकूणच खराब दिसणं शरीर खराब दिसणे.
अतिसार टाळण्यासाठी आणि उपचारासाठी प्रभावी उपाय काय?
स्वच्छ आणि गोड्या पाण्याचा सतत पुरवठा ठेवा.
पोल्ट्री परिसर दररोज स्वच्छ ठेवा.वेंटिलेशन सुधारणा आवश्यक.
उच्च दर्जाचे संतुलित खाद्य वापरा.
प्रोबायोटिक्स – आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी.
निर्जलीकरण टाळण्यासाठी इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन द्या.
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आजारी पक्ष्यांना दूर ठेवा.
अचानक खाद्य बदलणे टाळा.
फार्ममध्ये ताण कमी ठेवण्यासाठी शांत आणि सुसज्ज वातावरण तयार करा.
Mumbai,Maharashtra
June 24, 2025 3:36 PM IST