या गोगलगायींचा आयुष्यकाल साधारणपणे पाच ते सहा वर्षांचा असतो. त्यांचा विकासक्रम अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमधून पूर्ण होतो. हिवाळ्यात या गोगलगायी सुप्तावस्थेत जातात. शेतातील औजारे, यंत्रसामग्री, वाहने, बैलगाड्या, शेणखत, विटा, वाळू, रोपे आणि बेणे यांच्या माध्यमातून त्यांचा प्रसार झपाट्याने होतो. रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात या गोगलगायी बाहेर पडून पानांवर अनियमित आकाराची छिद्रे करतात तसेच पानांच्या कडा व फळांचे नुकसान करतात. विशेष म्हणजे, या गोगलगायींना कोवळी रोपे आणि शेंडे खाण्याची सवय असते. त्यामुळे पिके सुदृढ वाढण्याआधीच मोठ्या प्रमाणात हानी होते.
शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतात
अंडी गोळा करून नष्ट करावीत, गोगलगायींची अंडी हाताने गोळा करून नष्ट केली, तर त्यांच्या वाढीवर आळा बसतो.
उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी: जमिनीतील अंडी नष्ट होतात.
फळझाडांच्या खोडांना 10% बोर्डोपेस्ट लावावी, यामुळे गोगलगायी झाडावर चढत नाहीत.
शेताच्या कडेला 1 ते 2 फूट खोल चर काढावेत, गोगलगायी या आळ्यात अडकतात.
रात्री व पहाटे हाताने गोगलगायी गोळा कराव्यात, नंतर त्या साबणाच्या द्रावणात किंवा रॉकेल मिसळलेल्या पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात.
गोणपाट गुळाच्या द्रावणात भिजवून शेतात ठेवावा: सकाळी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी उचलून फेकाव्यात.
तंबाखूची भुकटी, चुन्याची पूड किंवा कॉफीची पूड 4 इंच लांबीचा पट्टा करून शेताच्या कडेला टाकल्यास गोगलगायी आत येत नाहीत. निंबोळी पेंड, निंबोळी अर्काचा वापर कीटकनाशक म्हणून करावा. मेटाल्डिहाईडऐवजी आयर्न फॉस्फेटचा 2 किलो प्रति एकर प्रमाणात वापर करावा. हे रसायन पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित असते.
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 12:29 PM IST