राज्य सरकारच्या महसूल विभागाने ही ऑनलाइन सेवा सुरू केली असून, bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टलवरून शेतकरी 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यामध्ये नाव दुरुस्ती, बोजा चढवणे किंवा कमी करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे आदी सेवा उपलब्ध आहेत. अर्जाची स्थितीही ऑनलाइन तपासता येते.
1)सर्वप्रथम भुलेख वेबसाइट उघडा.
2) तिथे 7/12 दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली”ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) नंतर “Public Data Entry” पेज ओपन होईल. “Proceed to Login” वर क्लिक करा.
4) नवीन खाते तयार करण्यासाठी “Create new user” वर क्लिक करून नाव, युजरनेम, पासवर्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता, पिन कोड आदी तपशील भरा.
5) खाते तयार झाल्यावर लॉगिन करा.
6) लॉगिननंतर मुख्य पेजवर “7/12 Mutations” या पर्यायावर क्लिक करा.
7) अर्जदार प्रकार Citizen असेल तर निवडा.
8) पुढे “Process” वर क्लिक केल्यावर फेरफार अर्जाचे पेज उघडेल.
जिल्हा, तालुका, गाव निवडा. नंतर फेरफार प्रकार म्हणून “वारस नोंद” निवडा. अर्जदाराची माहिती भरा. मयत व्यक्तीचे नाव व खाते क्रमांक टाका.
‘खातेदार शोधा’ वर क्लिक करा व गट क्रमांक निवडा. मृत्यूची तारीख भरा.
अर्जदार वारसांपैकी असेल तर होय,नसल्यास नाही निवडा. नंतर वारसांची माहिती भरा (नाव, जन्मतारीख, नाते, मोबाईल, पत्ता). सर्व नावे भरून “पुढे जा”वर क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. जसे की,
1) मृत्यू दाखल्याची प्रत (ग्रामपंचायत / नगरपालिका)
2) रेशनकार्ड
3) 8-अ उतारे
4) शपथपत्र (सर्व वारसांची माहिती नमूद असलेले)
कागदपत्रे अपलोड केल्यावर स्क्रीनवर फाईल अपलोड झाल्याचा संदेश येईल. नंतर स्वयंघोषणपत्र वाचून “Agree”वर क्लिक करा. आपला अर्ज सबमिट होईल. अर्ज तलाठी कार्यालयाकडे पाठवला जाईल व पडताळणीनंतर सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवली जातील.
अर्ज व शपथपत्र (कोर्ट फी स्टॅम्पसहित)
मृत्यू प्रमाणपत्र
तलाठी किंवा मंडल अहवाल
रेशनकार्ड प्रती
सरकारी नोकरी असल्यास सेवापुस्तिका उतारे
ग्रामपंचायतचा मृत्यू नोंद उतारा
सेवा पुस्तिकेत वारसांची नोंद असल्याचा पुरावा
नॉमिनी व वारस हक्क वेगळे असतात. बँक, विमा इत्यादी ठिकाणी नॉमिनीला रक्कम मिळू शकते, पण मालमत्तेचा वारस हक्क प्रमाणपत्राने सिद्ध करावा लागतो. ऑनलाइन अर्ज सुलभ असला तरी सर्व तपशील काळजीपूर्वक भरावेत, कारण चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज रद्द होऊ शकतो.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 12:42 PM IST
घरबसल्या शेतजमिनीवर वारसाची नोंद कशी करायची? अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या