जर जमिनीवर एकाहून अधिक मालक असतील आणि प्रत्येकाला आपला स्वतंत्र हिस्सा दाखवायचा असेल, तर पोट खराबा प्रक्रिया करावी लागते. यामुळे पुढील व्यवहार सोपे होतात आणि वादही टाळता येतात.
पोट खराबा काढण्याची पद्धत कशी असते?
पोट खराबा काढण्यासाठी संबंधित तालुक्यातील तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो.अर्जात आपल्या हिस्स्याचे तपशील,जमीन सर्व्हे क्रमांक,क्षेत्रफळ आणि आपल्या नावावरील हक्क स्पष्टपणे नमूद करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
सातबारा उतारा (7/12)
फेरफार नोंद (फेरफार क्रमांक असल्यास)
वारसाचा दाखला किंवा उत्तराधिकारी प्रमाणपत्र
ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड)
नकाशा (जमिनीचा स्केच)
तलाठी प्रत्यक्ष शिवारात जाऊन अर्जात नमूद केलेली जमीन मोजतो. जमीन कोणाच्या ताब्यात आहे, वास्तविक सीमा कुठे आहेत? याची पडताळणी केली जाते.
जर जमीन सामूहिक असेल तर इतर मालकांची संमती घेणे गरजेचे असते.सहमती नसल्यास तहसील कार्यालयातून पुढील प्रक्रिया किंवा न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असू शकतो.
पोट खराबा प्रक्रियेत इतर मालकांना नोटीस पाठवली जाते.कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी ठरावीक कालावधीत हरकती नोंदवाव्यात लागतात.जर हरकती नसेल,तर तलाठी प्रक्रिया पुढे नेतात.
सर्व तपासणीनंतर तलाठी व मंडळ अधिकारी पोट खराबा मंजूर करतात. त्याची नोंद फेरफार रजिस्टरमध्ये होते.त्या जमिनीच्या उताऱ्यात (7/12) तुमच्या स्वतंत्र हिस्स्याची नोंद स्पष्ट होते.
Mumbai,Maharashtra
June 28, 2025 3:03 PM IST