तथापि, काही शेतकऱ्यांना पुढील 20 वा हप्ता मिळाला नाहीतर त्यामागे काही तांत्रिक किंवा दस्तऐवजी त्रुटी असण्याची शक्यता असेल. जसे की,
eKYC पूर्ण असणे अत्यावश्यक
ऑनलाइन eKYC: pmkisan.gov.in वर जाऊन ‘eKYC’ पर्याय निवडा, आधार नंबर व OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
बायोमेट्रिक eKYC: जवळच्या CSC केंद्रात जाऊन फिंगरप्रिंटच्या माध्यमातून eKYC पूर्ण करा.
जमिनीचे कागदपत्रात आणि नावात चूक असणे
अनेकदा शेतकऱ्याचे नाव बँकेतील आणि 7/12 उताऱ्यात वेगवेगळे असते, ज्यामुळे हप्ता अडकतो.
अशा वेळी आपल्या तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागात संपर्क साधा.
लाभार्थी यादीत नाव तपासा
जर तुमचे नाव यादीत नसेल, तर हप्ता येणार नाही. वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ किंवा ‘Beneficiary List’ या पर्यायावर आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकून तपासणी करा.
शेतकरी ओळखपत्र अनिवार्य
केवळ PM-KISAN मध्ये नाव असून चालणार नाही. काही राज्यांमध्ये ‘Farmer Registry’ नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. CSC सेंटर किंवा राज्याच्या पोर्टलवर लॉगिन करून ही नोंदणी करा.
तक्रार कुठे करायची?
सर्व काही योग्य असूनही हप्ता न मिळाल्यास, खालील माध्यमांद्वारे संपर्क करा
हेल्पलाईन क्रमांक: 155261 / 1800-11-5526 / 011-23381092
ईमेल: pmkisan-ict@gov.in
वेबसाइटवरून देखील Beneficiary Status विभागात अडचणीचे कारण तपासता येईल.
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 3:35 PM IST