सर्वप्रथम लक्षात ठेवा, वाडीलोपार्जित मालमत्ता म्हणजे ती संपत्ती जी पूर्वजांकडून वंशपरंपरेने मिळालेली असते आणि ती विकत घेतलेली नसते. वडील जिवंत असतील तर त्यांनी इच्छापत्र (Will) तयार केलेल्या मालमत्तेसाठी त्यांचे हक्क महत्त्वाचे असतात. मात्र वडील निधन पावल्यावर त्यांचे वारसदार म्हणजे पत्नी, मुले, मुली, नातवंडे यांना कायदेशीर हक्क मिळतो.
भांडण टाळण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम, मालमत्तेची सातबारा उतारे (7/12 extracts), फेरफार नोंद (mutation entry), वारस साक्षांक (legal heir certificate), आणि जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे व्यवस्थित गोळा करा.
जर मालमत्तेचे एकाहून अधिक हक्कदार असतील, तर सर्वांनी एकमताने लेखी सहमती देणे आवश्यक असते. यात “NOC” म्हणजे No Objection Certificate घेतल्यास भविष्यात वाद होणार नाहीत.
तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे अर्ज करून अधिकृत वारस प्रमाणपत्र काढा. या प्रमाणपत्राने तुमच्या नातेसंबंधांची नोंदणी होते.
सातबारा उताऱ्यावर तुमचे नाव नोंदवण्यासाठी स्थानिक तलाठी कार्यालयात फेरफार अर्ज दाखल करावा लागतो. सोबत आवश्यक कागदपत्रे आणि सर्व वारसांची सहमती जोडावी लागते.
जर वडिलांनी / आजोबांनी इच्छापत्र तयार केले असेल, तर त्याची सत्यप्रत नोंदणी करणे आणि फेरफारात दाखल करणे आवश्यक असते. इच्छापत्रावर कोणाचा आक्षेप नसेल, तर नोंदणी जलद होते.
प्रत्येकाला कायदेशीर अधिकार स्पष्ट समजावून सांगावा. आपल्या भावंडांशी किंवा कुटुंबीयांशी चर्चा करून करार (Partition Deed) करणे योग्य ठरते. यात प्रत्येकाचा वाटा स्पष्ट नमूद केला जातो.
कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यासाठी वकिलांचा सल्ला घ्या संपत्ती वाटप व नोंदणीसाठी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणे नेहमी चांगले. त्यामुळे भविष्यात तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटी उरू नये.
Mumbai,Maharashtra
June 30, 2025 4:06 PM IST
भांडणं न करता वडिलोपार्जित जमीन, मालमत्ता कशी नावावर करायची? वाचा सविस्तर