By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Iran vs Israel War : खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Iran vs Israel War : खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा
टॉप स्टोरीज़

Iran vs Israel War : खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा

News Desk
Last updated: 2025/06/18 at 8:10 AM
News Desk
Share
2 Min Read

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा धोका वाढतोय

इराकचे परराष्ट्रमंत्री फुआद हुसैन यांनी इशारा दिला आहे की, जर युद्धाचा भडका अधिक वाढला, तर कच्च्या तेलाचे दर 200 ते 300 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात. याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल 200 ते 230 रुपये प्रति लिटर या किमतींवर होईल. यामुळे देशातील मूलभूत वस्तूंपासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वकाही महाग होण्याची शक्यता आहे.

भारतासाठी होर्मुज खाडीचे महत्त्व

भारताच्या दृष्टीने होर्मुजची खाडी हा एक अत्यंत महत्त्वाचा आयात मार्ग आहे. भारतात दोन तृतीयांशपेक्षा अधिक कच्चे तेल आणि अर्ध्याहून अधिक एलएनजी गॅस या मार्गातून येतो. जर इराणने हा मार्ग अडवला, तर तेल पुरवठ्याच्या साखळीवर गंभीर परिणाम होईल.

या वस्तूंवर महागाईचा थेट परिणाम होणार

तेल दरवाढ आणि पुरवठा अडथळ्यांमुळे खालील वस्तू मोठ्या प्रमाणावर महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनंदिन वापराच्या वस्तू: साबण, सर्फ, बिस्किटे, पेये, रंग

अन्नपदार्थ: खाद्यतेल, काजू, फळे

इलेक्ट्रॉनिक वस्तू: मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही

औद्योगिक घटक: प्लास्टिक, रसायने, सॉल्ट्स, यंत्रसामग्री, पोलाद व दागिने

शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका

कच्च्या तेलाचे दर वाढल्याने खते, डिझेल आणि पिकांसाठी लागणाऱ्या इतर इनपुट्सच्या किमतीही झपाट्याने वाढणार आहेत. यामुळे पिकाचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. परिणामी अन्नधान्याचे दर वाढून सर्वसामान्य ग्राहकावर महागाईचा तडाखा बसेल.

वाहतूक आणि किराणा महागणार

वाहतुकीचे दर वाढल्यामुळे किराणा व वस्तूंचा अंतिम विक्री दरही वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा घरखर्च बिघडू शकतो. याशिवाय मंदावलेल्या आयात-निर्यातीमुळे इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे, गॅझेट्स महागड्या होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, इस्रायल-इराण संघर्षाचा आर्थिक तणाव जगभर जाणवू लागला असून, भारतात पेट्रोलसह अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही महागाई सामान्यांच्या खिशाला जबरदस्त फटका देऊ शकते. शेवटी, जागतिक संघर्षाचा परिणाम घराघरात भाजीच्या दरांपासून पेट्रोलच्या पंपापर्यंत जाणवेल, याची शक्यता नाकारता येणार नाही.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 18, 2025 1:39 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा

TAGGED: agriculture, agriculture latest news, Iran vs Israel, Iran vs Israel agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : महसूल विभागाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेतल्या जाणार, कसा फायदा होणार?
Next Article Agriculture News : …..अन्यथा तुमच्या शेतातील घरे,बंगल्यांवर होणार बुलडोझर कारवाई! नियम वाचा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?