Last Updated:
Agriculture News : जमिनीच्या मालकीबाबत निर्माण होणाऱ्या वादांमुळे अचूक मोजणी करणे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक झाले आहे. शेतजमिनीच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी शासनाने द्रुतगती आणि नियमित मोजणी हे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
मुंबई : जमिनीच्या मालकीबाबत निर्माण होणाऱ्या वादांमुळे अचूक मोजणी करणे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक झाले आहे. शेतजमिनीच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी शासनाने द्रुतगती आणि नियमित मोजणी हे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मोजणीसाठी आवश्यक असलेल्या वेळापत्रकापासून ते शुल्क, वाद निर्माण झाल्यास काय करावे? याबाबत शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोजणीचे प्रकार आणि कालावधी
द्रुतगती मोजणी – ही प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण केली जाते.
नियमित मोजणी – यासाठी 60 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.
मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क
गाव भागातील मोजणीसाठी:
द्रुतगती मोजणी – 2 हेक्टरपर्यंत 8,000 रुपये
नियमित मोजणी – 2 हेक्टरपर्यंत 2,000 रुपये
शहरी भागात (महापालिका/नगरपालिका हद्दीत):
द्रुतगती मोजणी – 12,000 रु
नियमित मोजणी – 3,000 रु
वाद झाल्यास काय करता येईल?
स्वतंत्र गटाच्या मोजणीसाठी शेजाऱ्याची परवानगी आवश्यक नाही. पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी शेजाऱ्याची सहमती अनिवार्य असते. जर विरोध झाल्यास पोलिस बंदोबस्तात मोजणी केली जाऊ शकते. कायमस्वरूपी विरोध असल्यास, न्यायालयीन आदेशाशिवाय मोजणी होऊ शकत नाही.
वाद टाळण्यासाठी काय करावे?
तुमच्या जमिनीच्या बांधांची स्पष्टता ठेवा. तसेच मोजणी आधी शेजाऱ्यांना पूर्वसूचना द्या. तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या.परिस्थिती गंभीर असल्यासच पोलिस बंदोबस्त वापरा.
Mumbai,Maharashtra
जमीन मोजणीला शेजारच्या शेतकऱ्याचा विरोध होतोय का? मग हा कायदेशीर मार्ग वापराच