पेरू शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये
पेरू झाडे कोरडवाहू व अल्प पावसाच्या भागातही चांगली वाढतात. ही झाडे 15-20 वर्षे उत्पन्न देतात.एकदा लागवड केली की वर्षभर दोन ते तीन वेळा पेरूचे उत्पादन घेता येते. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या इतर हंगामी पिकांपेक्षा हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.
सुरुवातीचा खर्च आणि उत्पन्न
प्रारंभिक गुंतवणूक – प्रति एकर 30,000 ते 50,000 रुपये लागवड, खत, सिंचन व इतर कामांवर खर्च येतो.
झाडांची संख्या – एका एकरात साधारणतः 200- 250 पेरू झाडे बसवता येतात.
उत्पादन – एक झाड वर्षाला सरासरी 30 ते 50 किलो पेरू देते.
बाजारभाव – स्थानिक बाजारात पेरूला हंगामानुसार प्रति किलो 20 ते 50 रुपये दर मिळतो.
यामुळे एका एकरातून वर्षाला किमान 2.5 ते 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
उन्नत जाती व लागवडीचा काळ
महाराष्ट्रात पेरूच्या ‘लक्ष्मी’, ‘सरदार’, ‘ललित’, ‘श्वेता’ अशा उन्नत जाती यशस्वी ठरल्या आहेत. जून-ऑगस्ट आणि फेब्रुवारी-मार्च हे कालखंड लागवडीसाठी योग्य आहेत. ठिबक सिंचनाचा वापर, जैविक खतांची नियोजनबद्ध फवारणी, योग्य छाटणी आणि कीड नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास दर्जेदार पेरूचे उत्पादन घेता येते.
प्रक्रिया उद्योग व निर्यात संधी
केवळ कच्चा माल म्हणूनच नव्हे, तर पेरूपासून तयार होणाऱ्या जॅम, जेली, स्क्वॅश, ज्यूस यांची देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अनेक शेतकरी आता पेरूवर आधारित प्रोसेसिंग युनिट्स स्थापन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. निर्यातक्षम दर्जाचे फळ उत्पादन केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा नफा मिळवता येतो.
Mumbai,Maharashtra
June 10, 2025 12:36 PM IST
लखपती करणारे पीक! एकरात 250 झाडी लावा, बाजारात प्रचंड मागणी, वर्षाला कराल बक्कळ कमाई