मोजणीचे प्रकार आणि कालावधी
झटपट मोजणी : 30 दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण केली जाते.
नियमित मोजणी : यासाठी 60 दिवसांचा कालावधी लागतो.
हे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांच्या गरजेनुसार निवडता येतात.
मोजणीसाठी किती खर्च येतो?
ग्रामीण भागासाठी:
झटपट मोजणी:
2 हेक्टरपर्यंत – 8,000 रु
प्रत्येक अतिरिक्त 2 हेक्टरसाठी – 4,000 रु
नियमित मोजणी:
2 हेक्टरपर्यंत – 2,000 रु
पुढील प्रत्येक 2 हेक्टरसाठी – 1,000 रु
शहरी भागासाठी (महापालिका/नगरपालिका हद्दीत):
झटपट मोजणी: 12,000 रु
नियमित मोजणी: 3,000 रु
शेजाऱ्यांचा विरोध असल्यास काय करता येईल?
शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीची स्वतंत्र मोजणी करायची असल्यास, शेजाऱ्याची परवानगी लागणार नाही. गटात विभागणी करायची असल्यास शेजाऱ्याची सहमती अनिवार्य आहे.जर शेजारी सहकार्य करत नसेल, तर प्रशासन आणि पोलिस बंदोबस्ताच्या मदतीने मोजणी केली जाते. सततचा विरोध असेल,तर न्यायालयाच्या आदेशाशिवाय मोजणी करता येत नाही.
प्रशासनाची भूमिका आणि कायदेशीर मार्ग
भूमिअभिलेख विभागाने मोजणी थांबवली तर शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने मोजणी पुन्हा सुरू केली जाऊ शकते. वाद गंभीर असेल आणि जमीन तुकडींवर मतभेद असतील, तर न्यायालयीन आदेशच अंतिम निर्णय देतो.
वाद टाळण्यासाठी उपाययोजना काय?
मोजणीपूर्वी शेजाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी.
जमिनीच्या सीमारेषा स्पष्टपणे नकाशावर दाखवाव्यात.
शंका असल्यास, तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
अत्यावश्यक परिस्थितीतच पोलिस बंदोबस्त घ्यावा.
ठराविक शुल्क भरून अधिकृत प्रक्रिया पार पाडावी.
Mumbai,Maharashtra
May 05, 2025 12:17 PM IST
शेतजमीन मोजणी करण्याला शेजारच्या शेतकऱ्याचा विरोध होतोय का? या कायदेशीर मार्गाने सोडवा समस्या