जर घर बांधताना नियम मोडले गेले असतील किंवा तुमच्याकडे योग्य कागदपत्रांचा अभाव असेल, तर सरकारला ती इमारत पाडण्याचा अधिकार असतो. घर रजिस्ट्री झाली म्हणजे आपण मालक झालो, असा गैरसमज अनेकांना असतो. मात्र, रजिस्ट्री केवळ मालकी हक्काचे हस्तांतरण दर्शवते, ती मालकीचे अंतिम प्रमाणपत्र नसते.
रजिस्ट्रीसोबत टायटल डीड आणि चेन डीड तपासणे अनिवार्य असते.
टायटल डीड – प्रॉपर्टी विकणारी व्यक्तीच त्या मालमत्तेची खऱ्या अर्थाने मालक आहे का हे दाखवते.
चेन डीड – त्या प्रॉपर्टीचा मागील व्यवहारांचा इतिहास दाखवते, म्हणजे गेल्या काही वर्षांत मालकी हक्क कुणाकडून कुणाकडे गेला याची माहिती यात मिळते.
जर विक्रेत्याकडे टायटल डीड नसेल, तर त्याला ती मालमत्ता विकण्याचा अधिकार नसतो. अशा प्रकरणांमध्ये जमीन किंवा घर वादग्रस्त ठरू शकते.
घर खरेदीपूर्वी संबंधित प्रॉपर्टीवर कोणतंही कर्ज, तडजोडीचा खटला किंवा थकबाकी नाही ना, हे Encumbrance Certificate वरून कळते. तसेच, घराचे लेआउट व नकाशा महानगरपालिका किंवा प्राधिकरणाकडून मंजूर झाला आहे का, हे तपासा. जर बांधकाम मंजूर आराखड्यानुसार नसेल, तर इमारत बेकायदेशीर ठरते आणि त्या घरावर कधीही बुलडोझर फिरू शकतो.
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे स्थानिक प्राधिकरण देतं आणि ते इमारत नियम व मंजूर योजनेनुसार बांधली गेली असल्याचे प्रमाण असते. OC शिवाय घरात राहणं बेकायदेशीर आहे. त्याशिवाय वीज, पाणी किंवा गॅस कनेक्शन मिळण्यात अडचणी येतात.
घर खरेदी करताना पूर्वीच्या मालकाने प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे की नाही हेही पाहणं गरजेचं असतं. थकबाकी असल्यास नवीन मालक म्हणून तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते.
रजिस्ट्री झाली म्हणजे मालकी निश्चित होते, हा गैरसमज टाळा. टायटल डीड, चेन डीड, Encumbrance Certificate व OC यांची प्रत तपासा. प्रॉपर्टी टॅक्सची पावती आणि मंजूर नकाशा पाहा.
Mumbai,Maharashtra
June 28, 2025 6:24 PM IST
सावधान! तुमच्याकडे हे 5 कागदपत्रे असणे बंधनकारक,अन्यथा घरावर चालणार हातोडा