Last Updated:
Satbara Utara : राज्यातील शेतकरी व नागरिकांना आता त्यांच्या जमिनीशी संबंधित महत्वाची कागदपत्रे, सातबारा उतारा, 8 अ, ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत.
पुणे : राज्यातील शेतकरी व नागरिकांना आता त्यांच्या जमिनीशी संबंधित महत्वाची कागदपत्रे, सातबारा उतारा, 8 अ, ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत. ही सुविधा 1 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार असून, यासाठी भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे. ही डिजिटल यंत्रणेकडे वाटचाल करणारी महत्वाची पायरी ठरणार आहे.
सेतूमध्ये जाण्याची गरज नाही
यापूर्वी या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्र किंवा महा-ई सेवा केंद्रावर जावे लागायचे. तेथे 15 रुपयांच्या सरकारी शुल्कासोबतच जादा पैसेही मोजावे लागत. उतारा डाउनलोड करून पेनड्राईव्हमध्ये घ्यावा लागत असे. यामध्ये गोंधळ आणि गैरवापराची शक्यता वाढायची.मात्र आता तसं होणार नाही.
आता ही सगळी प्रक्रिया फक्त 15 रुपये शुल्क भरून सहज होणार आहे. महाभूमी पोर्टलवर मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर, संबंधित शेतकऱ्याला सातबारा, 8 अ उतारे आणि ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअॅपवर मिळतील. यामुळे हे कागदपत्र सहज, सुरक्षित आणि कुठेही वापरण्यास योग्य राहतील.
‘महाभूमी’ पोर्टलवर अनिवार्य नोंदणी
भूमिअभिलेख विभागाची नवी डिजिटल सेवा तीन स्तरांवर माहिती, सुविधा आणि सूचना उपलब्ध होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाभूमी’ संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या जमिनीचा अधिकार अभिलेख (मालकीचा पुरावा) आवश्यक राहणार आहे. नोंदणीसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी संबंधित सेवा सहजपणे मिळू लागतील. यामध्ये कायदेशीर प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, आणि भूमिअभिलेखाशी संबंधित शंका यांचे प्रश्नोत्तर स्वरूपात स्पष्टीकरण दिले जाईल.
तसेच, जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाल्यास जसे की मोजणी, फेरफार, नकाशा बदल इत्यादी. त्याची थेट सूचना संबंधित मालकाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि अधिकृत माहिती मिळून अधिक पारदर्शकता आणि सुविधा लाभणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 8:35 AM IST
सेतू कार्यालयात जाण्याची कटकट मिटली! जमिनीचे कागदपत्रे थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार