Last Updated:
Mahavitaran Light New Rate : महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) विजेच्या दरात टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत 26 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) विजेच्या दरात टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत 26 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो ग्राहकांच्या खिशाला मोठा आराम मिळणार आहे.
जुलै 2025 पासून नवीन दर लागू
पहिल्या टप्प्यात 10 टक्के दर कपात होणार असून, ही सवलत जुलै 2025 पासून लागू होईल. राज्यातील 70 टक्के ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे आहेत,त्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.मात्र,100 ते 500 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दरवाढ भोगावी लागणार आहे.
नवीन दरांचे तुलनात्मक रूप (प्रती युनिट):
युनिट श्रेणी सध्याचे दर (रु) 1 जुलैपासूनचे दर (रु)
1 ते 100 युनिट 6.32 5.74
101 ते 300 युनिट 12.23 12.57
301 ते 500 युनिट 16.77 16.85
500 युनिटपेक्षा जास्त 18.93 19.15
सौरऊर्जा आणि स्मार्ट मीटरसाठी विशेष सवलत
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी १० टक्के अतिरिक्त सवलत (TOU – Time of Use सवलत) मिळणार आहे. घरी सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ग्राहकांना विशेष प्रोत्साहन देण्याची तरतूदही आयोगाच्या आदेशात समाविष्ट आहे. ही योजना राज्याच्या ऊर्जा खर्चात बचत करणार असून,हरितऊर्जा वापरास चालना देणार आहे.
ग्राहकांना मोठा दिलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आयोगाच्या या निर्णयामुळे घरगुती,औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दिवसा खात्रीशीर वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे.तसेच हरितऊर्जेवरील भरामुळे वीजखरेदी खर्चात बचत होऊन दर कपात शक्य झाली.”
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 10:07 AM IST
शेतकऱ्यांसह नागरिकांचे 1 जुलैपासून लाईटबिल कमी येणार! नवीन दर किती? वाचा सविस्तर