केशर ही अतिशय मौल्यवान आणि सर्वाधिक मागणी असलेली वनस्पती आहे. पारंपरिकपणे केशर केवळ जम्मू-काश्मीरमध्ये पिकवले जात होते. मात्र आता हायड्रोपोनिक किंवा कंट्रोल्ड एन्क्लोजर फॉर्मिंगच्या साहाय्याने, केशर शहरातल्या फ्लॅटमध्ये गच्चीवर किंवा छोट्या खोलीतही यशस्वीरित्या उगवू शकतो.
केशर लागवडीसाठी आवश्यक साहित्य
10×10 च्या छोट्या खोलीत केशर शेती करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. जसे की,
रॅक सिस्टिम: रोपे अनेक स्तरांमध्ये ट्रे लावण्यासाठी
क्लायमेट कंट्रोल यंत्रणा: हवेचे तापमान 15-20°C दरम्यान ठेवण्यासाठी
ह्यूमिडीफायर आणि लाइट्स: आर्द्रता व प्रकाश नियंत्रणासाठी
केशर रोपे : जे तुम्हाला लागवडीसाठी लागतील
लागवड आणि उत्पादन प्रक्रिया
केशरचे रोपे जुलै-ऑगस्टमध्ये लावले जातात.जे तुम्ही काश्मीर वरूनही मागवू शकतात. एक ट्रे 10-15 रोपे लावू शकतात. ट्रे एकमेकांवर रॅक पद्धतीने ठेवता येतात. वाफसा तयार करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया संपूर्णतः मातीविना होते. सुमारे 80 ते 90 दिवसांत केशरच्या फुलांपासून केशरचे धागे वेचण्यास सुरुवात होते. प्रत्येक रोपामधून 1 ते 2 फुले मिळतात आणि एका फुलामधून 3 लाल धागे (stigmas) केशर म्हणून वेचले जातात.
कमाईचे गणित कसं?
एका 10×10 च्या खोलीत सुमारे 10,000 रोपे लावता येतात. या बल्बमधून सरासरी 300-400 ग्रॅम शुद्ध केशर मिळू शकते. बाजारात 1 किलो शुद्ध केशरचे दर 2.5 लाख ते 3 लाख रुपये पर्यंत असतात. यानुसार, एका सीझनमध्ये 70,000 ते 1.2 लाख रुपयांची कमाई शक्य आहे. आणि जर वर्षाततून 3 वेळेस लागवड केली तर 3 ते 5 लाख रुपये उत्पन्न सहज शक्य आहे.
बाजारपेठ आणि विक्री
शुद्ध केशरला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. तुम्ही ऑनलाइन मार्केटप्लेस (जसे Amazon, Flipkart), आयुर्वेदिक कंपन्या किंवा स्थानिक औषधी दुकाने, हॉटेल उद्योग यांना थेट विक्री करू शकता.
Mumbai,Maharashtra
May 21, 2025 12:08 PM IST
तुमच्याकडे रिकामी रूम आहे का? मग या रोपांची लागवड करा, 5 लाखांपर्यंत कमाई कराल