Last Updated:
EK Rajya EK Nondani : देशात मालमत्तेची मागणी वेगाने वाढत आहे. प्रत्येक दिवशी हजारो मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार होतात. मात्र, दुसऱ्या शहरातील मालमत्ता घेतल्यानंतर त्यासाठी त्या शहरात जाऊन नोंदणी करणे गरजेचे असते. हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत होते.
मुंबई : देशात मालमत्तेची मागणी वेगाने वाढत आहे. प्रत्येक दिवशी हजारो मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार होतात. मात्र, दुसऱ्या शहरातील मालमत्ता घेतल्यानंतर त्यासाठी त्या शहरात जाऊन नोंदणी करणे गरजेचे असते. हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत होते.
या अडचणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 1 मे 2025 पासून राज्यात ‘एक राज्य, एक नोंदणी’, ‘फेसलेस रजिस्ट्रेशन’ आणि ‘स्टॅम्प रजिस्ट्रेशन’ या प्रणाली लागू केल्या जात आहेत.
काय आहे ‘एक राज्य, एक नोंदणी’ प्रणाली?
ही प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यात कुठलीही मालमत्ता कुठूनही नोंदवता येणार आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबईत राहत असून नागपूरमध्ये मालमत्ता खरेदी केली असेल, तर त्याची नोंदणी मुंबईतच करता येईल.नागपूरला जाण्याची गरज नाही.यामुळे वेळ,खर्च आणि कागदोपत्री झंझट मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
डिजिटल युगात मालमत्ता नोंदणी
‘फेसलेस रजिस्ट्रेशन’ आणि ‘स्टॅम्प रजिस्ट्रेशन’मुळे प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक होणार आहे. डिजिटल माध्यमातून दस्तऐवजांची नोंदणी, पडताळणी आणि कर भरणा शक्य होईल. हे सर्व ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा अधिकृत सुविधांद्वारे करता येईल.
दरम्यान, 1 मे 2025 पासून ‘एक राज्य,एक नोंदणी’ प्रणाली राज्यभरात लागू होणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सुधारणा अमलात आणली जात आहे. नवीन प्रणालीमुळे महाराष्ट्रात मालमत्ता व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहेत.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 2:05 PM IST
मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत 1 मेपासून होणार मोठे बदल! नागरिकांना कसा फायदा होणार?