Last Updated:
Fal Pik Vima: मृगहारातील फळपीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी आहे. द्राक्ष, पेरूसह इतर फळांचा विमा काढण्यासाठी 6 जुलै शेवटची मुदत असणार आहे.
जालना: फळबागधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मृगबहारासाठी पीक विमा भरण्याची मुदत 6 जुलै पर्यंत वाढवली आहे. द्राक्ष, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि चिकू या पिकांसाठी फळ पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 जुलै होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे फळपिक विमा भरता आला नाही. त्यामुळे या मुदतीत वाढ करण्यात आली असून आता फक्त 2 दिवस बाकी आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना फळ पीक विमा भरता आला नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने 6 दिवस मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे द्राक्ष, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि चिकू उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या फळ पिकांचा विमा 6 जुलै पर्यंत भरता येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मृगबहारासाठी हा फळ पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन फळपीक विमा भरू शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप विमा भरलेला नाही त्यांनी 6 जुलैपर्यंत सीएसी केंद्रावर जाऊन विमा भरावा आणि आपल्या फळ पिकांना संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, पेरू, चिकू, मोसंबी, द्राक्ष, लिंबू आणि संत्रा या फळपीकांसाठी दोन वेळा फळ पीक विमा भरता येतो. मृगबहारासाठी आणि आंबिया बहारासाठी ही सोय उपलब्ध आहे. सध्या मृग बहारासाठी 6 जुलै पर्यंत फळपिक विमा भरण्याची अंतिम तारीख असून आंबिया बहारासाठी फळपीक विमा भरण्याचा कालावधी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होतो.
Jalna,Maharashtra
July 04, 2025 2:51 PM IST
Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!