कोणत्या पिकांसाठी कोणती अंतिम तारीख?
संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष – 30 जून 2025
मोसंबी, चिकू – 30 जून 2025
डाळिंब – 14 जुलै 2025
सीताफळ – 31 जुलै 2025
अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी व प्रक्रिया
कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल – https://pmfby.gov.in/farmerLogin – शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी आणि AgriStack योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहेत.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
बँक पासबुक
7/12 उतारा (जमीन धारणा दाखला)
ई-पिक पाहणीसह Geo-tagged फोटो
शेतकरी ओळख क्रमांक (AgriStack अंतर्गत)
तसेच ई-पिक पाहणी नोंद नसल्यास विमा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानावर विमा संरक्षण
या योजनेचा उद्देश हवामान बदलांमुळे फळपिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जसे की, उदाहरणार्थ:
कमी पाऊस किंवा खंडित पावसामुळे होणारे नुकसान
अधिक पाऊस किंवा आर्द्रतेमुळे होणारे झाडांचे नुकसान
या परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा योजनेतून भरपाई दिली जाते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतल्यानंतरही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ई-पिक पाहणी नोंदणी पूर्ण करता येते, असे कृषी संचालक विनायकुमार आवटे यांनी स्पष्ट केले. मात्र, विमा अर्जासाठी प्राथमिक टप्प्यात काही कागदपत्रे अनिवार्य असून, त्यात कोणतीही त्रुटी असल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 4:01 PM IST