Last Updated:
PM Kisan 20th Installment : देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारकडून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रु ची पाठवले जाणार असून, योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
शेतकऱ्यांनी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यास हप्त्याचा लाभ सहज मिळू शकतो. जसे की,
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे.बँक खाते व आधार तपशील अपडेट असणे. लाभार्थी यादीत नाव नोंदलेले असणे. जर या पैकी काही त्रुटी राहिल्या, तर हप्ता थांबण्याची शक्यता असते.
https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. “शेतकरी कोपरा” (Farmer’s Corner) विभागात “लाभार्थी यादी” (Beneficiary List) निवडा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरून “यादी मिळवा” वर क्लिक करा. तुमचे नाव यादीत दिसले, तर तुम्हाला हप्ता मिळेल.
वेबसाइटवर “Self-Registered Farmer/CSC Farmer Status” निवडा. आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून सबमिट करा. नोंदणी व मंजुरीची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
OTP आधारित e-KYC: जर आधार मोबाईलशी लिंक असेल, तर pmkisan.gov.in वरून OTP द्वारे करता येते.बायोमेट्रिक e-KYC साठी जवळच्या CSC (Common Service Center) ला भेट द्या.
जर तुमचे आधार-बँक जुळत नसेल, मोबाईल नंबर चुकीचा असेल, किंवा e-KYC पूर्ण नसेल, तर तुमच्या जिल्ह्यातील संपर्क अधिकारी (POC) ची माहिती pmkisan.gov.in वरून घ्या आणि संपर्क साधा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 18 जुलै 2025 च्या सुमारास जाहीर केला जाऊ शकतो. अशी शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतिहारी येथे होणाऱ्या कार्यक्रमात या हप्त्याची अधिकृत घोषणा करतील. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याआधीचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता.
Mumbai,Maharashtra
July 14, 2025 2:27 PM IST
PM Kisan चा 20 वा हप्ता जुलैमध्येच येणार! लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का? लगेच तपासा