पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहारमधील मोतिहारी (पूर्व चंपारण) येथे एक भव्य जाहीर सभा संबोधित करणार आहेत. त्यावेळीच 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20 वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तयार राहावे.
6 कामं तातडीने करून घ्या
ई-केवायसी (e-KYC) ही योजना लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे. e-KYC पोर्टल किंवा CSC (Common Service Center) केंद्रावर जाऊन करता येते.
तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी योग्यरित्या जोडलेला असेल, तरच हप्ता खात्यात जमा होतो. लिंक नसल्यास आर्थिक सहाय्य अडू शकते.
IFSC कोड, खाते क्रमांक किंवा नावातील कोणतीही चूक हप्त्याच्या अडथळ्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे खात्याची माहिती पुन्हा एकदा तपासा.
जमिनीशी संबंधित नोंदी अद्ययावत असल्याच हप्ता मंजूर होतो. यासाठी राज्य पोर्टल किंवा CSC केंद्रावर जाऊन पडताळणी करून घ्या.
pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘लाभार्थी स्थिती’ विभागात तुमचा मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासा.
OTP व इतर सूचनांसाठी मोबाइल क्रमांक अचूक आणि अपडेट असणे आवश्यक आहे.
शेवटचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान मोदींनी भागलपूर (बिहार) येथे वितरित केला होता. आता 20 वा हप्ता जुलै महिन्यात जाहीर होणार असल्याने, संबंधित शेतकऱ्यांनी आपली नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता त्वरित करावी.
दरम्यान, शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी, बँक खाते लिंक, जमीन पडताळणी व नाव तपासणी करून PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्रता निश्चित करावी. ही थोडीशी दक्षता तुमच्या खात्यात 2,000 रु चा हप्ता वेळेवर जमा होण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
Mumbai,Maharashtra
July 15, 2025 11:36 AM IST