Last Updated:
PM Kisan 20 th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवेळी प्रमाणे याहीवेळी पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) पाठवली जाणार आहे.
याआधी 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला होता, ज्याचा लाभ 2.4 कोटी महिला शेतकरी आणि एकूण 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता.
PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही अजूनही या योजनेसाठी नोंदणी केलेली नसेल, तर खालील स्टेप्सद्वारे सहज अर्ज करू शकता. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ‘Farmer Corner’ विभागात जा. ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरून पुढे जा. आवश्यक माहिती भरून ‘yes’ वर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्या.
वर्षातून 6,000 रुपयांचा लाभ
PM किसान योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. योजनेचा उद्देश देशातील भूमिधारक शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य देणे आहे, जेणेकरून शेती व घरगुती खर्च भागविता येतील.ही योजना फक्त अशा शेतकऱ्यांसाठी लागू आहे, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे.
20 वा हप्ता कधी मिळणार?
मीडिया रीपोर्टनुसार, या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
June 22, 2025 1:59 PM IST