योजनेत समाविष्ट पीक प्रकार
खरीप हंगामातील पिके
भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा
रब्बी हंगामातील पिके
गहू, रब्बी ज्वारी (बागायत/जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा
राज्यात अधिसूचित क्षेत्रांसाठी विशेषतः भात आणि उन्हाळी भातासाठी तांदळाच्या सरासरी उत्पादनानुसार विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
किती पैसे भरावे लागणार?
सोयाबीन हेक्टरी -817.50 रू.
मका हेक्टरी – 360 रू.
बाजरी हेक्टरी – 160 रू.
तूर हेक्टरी – 117.50 रू.
मूग हेक्टरी – 55 रू.
भुईमूग हेक्टरी -112.50 रू.
कांदा हेक्टरी – 680 रू.
अनुदान धोरण कसं आहे?
कोरडवाहू जिल्ह्यांसाठी: केंद्र सरकारचा हिस्सा 30% पर्यंत
बागायती जिल्ह्यांसाठी: केंद्र सरकारचा हिस्सा 25% पर्यंत
तर उर्वरित हिस्सा राज्य शासनाकडून दिला जाईल. शेतकऱ्यांना केवळ त्यांचा निश्चित हिस्सा भरायचा आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
दरम्यान, सुधारित पीक विमा कवच मिळवण्यासाठी संबंधित तारीखपूर्वी विमा हप्ता भरावा. अधिसूचित महसूल मंडळ, मंडळगट किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ही योजना लागू होईल. विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल.
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 12:49 PM IST
1 जुलैपासून सुधारित पीक विमा अर्जप्रक्रिया सुरू होणार, पिकनिहाय किती पैसे भरावे लागणार? वाचा सविस्तर