Last Updated:
ऋषिकेश याने सिव्हिल डिप्लोमा या क्षेत्रात शिक्षण घेतले असून देखील नोकरी न करता आज स्वतःचा दूध व्यवसाय करत आहे. यामधून त्याला लाखोंची कमाई होत आहे.
नाशिक: आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द असली तर माणूस कुठल्याही क्षेत्रात आपले नाव कमावत असतो. अशी एक गोष्ट नाशिकच्या ऋषिकेश मते या 28 वर्षीय तरुण उद्योजकाची आहे. ऋषिकेश याने सिव्हिल डिप्लोमा या क्षेत्रात शिक्षण घेतले असून देखील नोकरी न करता आज स्वतःचा दूध व्यवसाय करत आहे. यामधून त्याला लाखोंची कमाई होत आहे.
ऋषिकेश हा शिक्षण घेत असतानाच वडिलांना रोज दूध काढण्यात आणि ते विक्री करण्यास मदत करत असे. तसेच शिक्षण क्षेत्रात पहिल्यापासून काही रस नसल्याने पुढे जाऊन आपण हा आपला पिढीजात व्यवसाय वाढवू या विचाराने गेल्या 4 वर्षांपासून ऋषिकेश हा त्यांचा व्यवसाय सांभाळत असल्याचे त्याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
ऋषिकेश याच्या वडिलांकडे सुरुवातीला फक्त चार ते पाच गाई होत्या. त्यात आता काहीतरी बदल करावा जेणेकरून आपले उत्पन्न वाढेल या हेतूने ऋषिकेश याने तब्बल 30 गीर गाई या विकत आणल्या आहेत. तसेच या गीर गाईच्या माध्यमातून रोजचे 120 ते 150 लिटर दूध हा तरुण विक्री करत असतो. त्याचबरोबर या दुधापासून पारंपरिक पद्धतीने तूप आणि पनीर सुद्धा हे बनवत असतो.
ऋषिकेश हा सध्या गीर गाई विषयक माहिती घेत आहे. त्याचे पुढील स्वप्न आहे यापासून विविध औषधी आणि कामात येणाऱ्या गोष्टी बनवण्याचे. आज कुठे नोकरी केली असती तर मला पाहिजे तितका पगार हा मिळाला नसता पण आज मी माझा स्वतःचा व्यवसाय करत असून दरमहा 4 ते 5 लाखाचे उत्पन्न घेत असल्याचे ऋषिकेश सांगतो.
Nashik,Maharashtra
June 12, 2025 3:23 PM IST
Milk Business: नोकरीत काय मिळतंय? उच्चशिक्षित तरुणानं घेतल्या 30 गाई, आता कमवतोय 5 इंजिनिअरचा पगार