By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News: अनुभवातून शिक्षण, विद्यार्थ्यांनी केली कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री, तब्बल 4 लाख कमाई
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News: अनुभवातून शिक्षण, विद्यार्थ्यांनी केली कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री, तब्बल 4 लाख कमाई
टॉप स्टोरीज़

Agriculture News: अनुभवातून शिक्षण, विद्यार्थ्यांनी केली कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री, तब्बल 4 लाख कमाई

News Desk
Last updated: 2025/05/30 at 6:50 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विकसित केलेल्या फुले समर्थ कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्रमी विक्री केली आहे. अवघ्या तीन तासांत 162 किलो बियाण्यांची विक्री करत त्यांनी 86 शेतकऱ्यांना बियाणे वितरित केले आणि तब्बल 4 लाख 5 हजार रुपयांची कमाई केली.कांदे 

Last Updated:May 30, 2025 12:06 PM IST

विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विकसित केलेल्या फुले समर्थ कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्रमी विक्री केली आहे. अवघ्या तीन तासांत 162 किलो बियाण्यांची विक्री करत त्यांनी 86 शेतकऱ्यांना बियाणे वितरित केले आणि तब्बल 4 लाख 5 हजार रुपयांची कमाई केली.

X

कांदे 

पुणे : पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विकसित केलेल्या फुले समर्थ कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्रमी विक्री केली आहे. अवघ्या तीन तासांत 162 किलो बियाण्यांची विक्री करत त्यांनी 86 शेतकऱ्यांना बियाणे वितरित केले आणि तब्बल 4 लाख 5 हजार रुपयांची कमाई केली.

उद्यानविद्या विभागातील अंतिम वर्षाच्या 70 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती अनुभव देण्यासाठी कृषी अनुभवातून शिक्षण उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी दोन गटांमध्ये विभागून स्ट्रॉबेरी कांद्याचे बियाणे उत्पादन करतात. रोप तयार करण्यापासून लागवड, व्यवस्थापन आणि बियाणे तयार होईपर्यंत सर्व प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करतात.

या उपक्रमात तयार करण्यात आलेले फुले समर्थ हे कांद्याचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित झालेले असून, याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे वाण 85 ते 90 दिवसांत तयार होते. उभट-गोल आणि लालसर रंगाचा असल्यामुळे बाजारात त्याला मागणीही चांगली असते. खरीप हंगामासाठी हे वाण विशेषतः उपयुक्त ठरते.

विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या 162 किलो बियाण्याची किंमत प्रति किलो 2500 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. केवळ तीन तासांत संपूर्ण साठा विकला गेला. मिळालेल्या उत्पन्नातून सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये समान प्रमाणात वाटला जातो. 50 टक्के विद्यार्थ्यांना आणि 50 टक्के महाविद्यालयाला.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शेतीतून उत्पन्नाचे स्रोत समजावून देणे आणि त्यांना शेतीचा व्यावसायिक दृष्टीकोन देणे. शेतकऱ्यांनाही दर्जेदार बियाणे मिळावे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा, या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांनी ही माहिती दिली असून, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Location :

Pune,Maharashtra

First Published :

May 30, 2025 12:06 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Agriculture News: अनुभवातून शिक्षण, विद्यार्थ्यांनी केली कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री, तब्बल 4 लाख कमाई

TAGGED: agriculture, Onion seeds, onion seeds price, onion seeds price market, onion seeds sale, Phule Samarth onion varieties, Pune, कांदा बियाणे, कांदा बियाणे किंमत, कांदा बियाणे किंमत मार्केट, कांदा बियाणे विक्री, कृषी, पुणे, फुले समर्थ कांदा वाण
Previous Article व्यापार दर: ट्रम्प यांनी पटकन 150 दिवसांचे दर ‘प्लॅन बी’ केले – कोर्टाने ट्रम्प टेरिफ्स रोखले परंतु प्रशासनाने 15 पीसी तारिफ योजनेचे 150 दिवसांचे अनावरण केले.
Next Article ओयो आयपीओ, मूळ कंपनीचे नाव, सोलश मीडियावरील सूचना आणण्यासाठी बदलेल; विजेत्यास बक्षीस मिळेल – आयपीओ बाउंड ओयो प्रीमिकेशन आमंत्रित सूचनांचा पाठपुरावा करण्यासाठी पालक फर्मचे नाव बदलण्याचा प्रयत्न करीत आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?