या निर्णयाचा परिणाम विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, श्रमिक वर्गावर आणि सर्वसामान्य नागरिकांवर थेट आर्थिक ताणाच्या स्वरूपात झाला आहे. विशेषतः जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, अधिवास प्रमाणपत्र यांसारख्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांचे शुल्क वाढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शासनाकडे दरवाढीच्या पुनर्विचाराची मागणी
शासनाच्या महसूल, सामाजिक न्याय, गृह आणि ग्रामीण विकास विभागाच्या एकूण 1027 शासकीय सेवा ‘आपले सरकार सेवा केंद्रां’तून दिल्या जातात. मात्र, महत्त्वाच्या सेवांचे दर आता दुपटीने वाढले आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेचा रोष वाढत आहे.
सेवा सेवा नवीन दर (रु) जुना दर (रु)
सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र 69 34
उत्पन्नाचा दाखला 69 34
वंशवळ प्रतिज्ञापत्र 69 34
वय व अधिवास प्रमाणपत्र 69 34
वारसा प्रमाणपत्र 69 34
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 69 34
नॉन क्रिमीलेअर प्रतिज्ञापत्र 128 58
नॉन क्रिमीलेअर नूतनीकरण 128 58
जातीचे प्रमाणपत्र 69 34
जातीचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्रासह) 128 58
दरम्यान, ‘आपले सरकार’ व ‘सेतू’ सेवा केंद्रांवर सध्या आधीच्या तुलनेत जवळपास 100% दरवाढ करण्यात आली आहे. शिक्षण, सरकारी योजनांतील लाभ, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे खर्च वाढल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला आहे.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 6:45 PM IST
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागणार! आपले सरकार सेवा केंद्राच्या शुल्कात दुप्पट वाढ