By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : अमेरीकेचा भारतासोबत करार कि गनिमी कावा? या शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : अमेरीकेचा भारतासोबत करार कि गनिमी कावा? या शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका
टॉप स्टोरीज़

Agriculture News : अमेरीकेचा भारतासोबत करार कि गनिमी कावा? या शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका

News Desk
Last updated: 2025/06/28 at 9:19 PM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:June 28, 2025 1:42 PM IST

Ind America gm Agreement : चीनसोबत व्यापार करार पूर्ण झाला आणि अमेरिकेसाठी चीनची बाजारपेठ खुली झाली. आता भारतासोबत मोठा व्यापार करार होणार आहे. हा करार 9 जुलैच्या आधी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत.

agriculture news

मुंबई : चीनसोबत व्यापार करार पूर्ण झाला आणि अमेरिकेसाठी चीनची बाजारपेठ खुली झाली. आता भारतासोबत मोठा व्यापार करार होणार आहे. हा करार 9 जुलैच्या आधी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत. असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र व्यापार कराराच्या अंतिम चर्चेदरम्यान भारतावर शेती आणि इतर संवेदनशील क्षेत्रातील शिरकावाविषयी अमेरिकेच्या मागणीचा दबाव असणार आहे, असे या विषयातील जाणकारांचे म्हणणे आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार झाला, हे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हावार्ड लूटनिक यांनी स्पष्ट केले. मात्र नेमका करार काय झाला? याविषयी दोघांनी स्पष्टता दिली नाही. तसेच चीनकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः अंतिम करार केला. आम्ही आता इतर देशांसोबत करार करत आहोत, असेही लूटनिक यांनी माध्यमांना सांगितले.

अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर 2 एप्रिल रोजी 26 टक्के आयात शुल्क लावले होते. त्यानंतर व्यापारी वाटाघाटींसाठी 90 दिवसांची मुदत दिली होती. त्याची मुदत 9 जुलै रोजी संपत आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की चीनसोबतचा व्यापार करार पूर्ण झाला. आता भारतासोबत मोठा करार होणार आहे. चीनप्रमाणेच भारताचीही बाजारपेठ अमेरिकेच्या वस्तूंसाठी खुली होणार आहे. आमच्याकडे इतर देशांच्याही कराराविषयी बोलणी सुरू आहेत. त्यात भारतासोबतचा करार मोठा असेल. “आम्ही सर्वांसोबतच व्यापार करार करणार नाही. सर्वांची आमच्यासोबत करार करण्याची इच्छा आहे,” असेही ट्रम्प म्हणाले.

अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान होणार

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराविषयी माहिती असलेल्या व्यक्तींनी सांगितले, की नुकत्याच झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा निघाला. अंतिम चर्चेतून तोडगा निघण्याची आशा आहे. अमेरिकेला शेतीमाल आणि इतर संवेदनशील क्षेत्रात शिरकाव हवा आहे. याचा दबाव अंतिम चर्चेदरम्यान असणार आहे. विशेषतः अमेरिका भारताच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मागण्या रेटू शकते. अमेरिकेला डेअरी प्रॉडक्ट, सोयाबीन आणि मक्याची निर्यात भारतात करायची आहे. अमेरिकेतून या दोन शेतीमालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. असे झाल्यास सर्वात मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसणार आहे.

इतर अडचणी काय?

व्यापारी वाटाघाटी करताना अमेरिका भारताच्या वस्तू आयातीवर शुल्क तसेच शुल्काव्यतिरिक्त इतर आयात अडथळे लावत आहे. याविषयी अमेरिकेने भारताच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे सध्याच्या चर्चेत अमेरिकेकडून कायदेशीर ट्रेड प्रमोशन अथॉरिटी नाही. हे असल्याशिवाय अमेरिका भारतावरील शुल्क कमी करू शकणार नाही. त्यामुळे चर्चेतून दीर्घकालीन व्यापार करार होण्यावर मर्यादा असतील, असंही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 28, 2025 1:40 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Jambhul Farming: ना पाण्याचं टेन्शन, ना खर्चाची चिंता, शेतकऱ्यानं लावली 100 झाडं, वर्षाची कमाई 4 लाख!
Next Article कृषी हवामान : विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार, पाऊस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

केमिकल फंड, अनुदानित पोर्ट क्लस्टरला चीनकडून आयातीवरील अवलंबन कमी करण्याची आवश्यकता आहे: टीएएनए पासून आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी एनआयटीआय आयगला रासायनिक फंड सबसिडी पोर्ट क्लस्टरची आवश्यकता आहे
Business July 4, 2025
गीग कामगार भरतीची गती उत्सवाच्या हंगामापूर्वी वाढेल, वित्तीय वर्ष 26 मध्ये संख्या 1.19 कोटीपर्यंत पोहोचू शकते – मागणी वाढविण्यासाठी वित्तीय वर्ष 26 उत्सवाच्या हंगामात गिग वर्क भाड्याने देणे
Business July 4, 2025
फॉक्सकॉनच्या कर्मचार्‍यांना भारतातून बोलावले जावे: मेममनी – फॉक्सकॉनच्या कर्मचार्‍यांना भारतातून बोलावले जाईल
Business July 4, 2025
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या सिनेटचा सदस्य – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी रशियन तेलाबद्दल चिंता व्यक्त केली.
Business July 3, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?